ठाणे : शहापूर तालुक्यातील कॉंग्रेसने अभियानाला सुरुवात केली आहे. त्यातच भाजपाचे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील य, भारत तुटलेला नसताना 'भारत जोडो', 'आता 'हात जोडो' म्हणजे काय? असा सवाल उपस्थित करून कॉंग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हणाले कि, खासदार राहुल गांधी यांनी तर हाताला शंकराची उपमा केली, तर भारत जोडो यात्रेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनंतर आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. यावर राज्यमंत्री पाटील यांनी थेट ठाकरे गटावर आरोप करत सांगितले कि, हा त्यांच्या महाविकास आघाडीचा प्रश्न आहे.
हात जोडो अभियानाला सुरुवात : कॉग्रेसचे खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर आता पक्षाला मजबूत करत थेट जनतेच्या दारावर जाण्यासाठी काँग्रेस 'हात से हात जोडो' हे अभियान घेणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शहापूर तालुका अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली हात जोडो अभियानाला वाशिंद पूर्व येथून ध्वजारोहण, पदयात्रा व चौकसभेच्या माध्यमातून आजच सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील कॉंग्रेस पदाधीकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय पक्षांचे लक्ष: कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर 'हात से हात जोडो' हे अभियान घेणार आहेत. २६ जानेवारीपासून देशभरात याची सुरुवात होणार आहे. आता भाजपचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी हात जोडोवर टीका केली. या टीकेनंतर हे काँग्रेस पक्षाचे 'हात से हात जोडो' हे अभियान राज्यासह जिल्ह्यात ठाणे किती यशस्वी होते का? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे 'हात से हात जोडो' हे अभियान प्रत्येक प्रदेश काँग्रेस कमिटीला राज्य स्तरावर राबवायचे आहे. गाव पातळी, ब्लॉक पातळीपासून तर तालुका व जिल्हा स्तरावर समांतर पद्धतीने स्थानिक नेते व पदाधिकारी याचे आयोजन करणार आहेत. हे 'हात से हात जोडो' अभियान राबवणार असून यात प्रभात फेऱ्या, पदयात्रा, बैठका, सभा यांचा समावेश असणार आहे. या माध्यमातून मतदारांच्या दारावर पोहचण्याचा काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे.