ETV Bharat / state

ठाण्यात बाईक चोरट्याला अटक; 6 बाईकसह डझनभर बॅटऱ्या जप्त - Senior Inspector of Police K.P. Thorat

एका बाईक चोरट्याला विठ्ठलवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून 2 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ठाण्यात बाईक चोरट्याला अटक
ठाण्यात बाईक चोरट्याला अटक
author img

By

Published : Dec 1, 2020, 8:23 PM IST

ठाणे - एका बाईक चोरट्याला विठ्ठलवाडी पोलिसांच्या पथकाने शिताफीने पकडले. या चोरट्याला उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील माणेरेगावातून अटक आहे. तसेच त्याच्याकडून आतापर्यंत 6 बाईकसह डझनभर बॅटऱ्या जप्त केल्या आहेत. फिरोज सिंकदर शेख (वय, 20,रा. वालधुनी कल्याण) असे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या बाईक चोराचे नाव आहे.

सहायक पोलीस आयुक्त डी. डी.टेळे
बाईक चोरटयांचा शहरात धुमाकूळ -

अनलॉक झाल्यापासून बाईक चोरटयांनी शहरात धुमाकूळ घातला. दररोज शहरातील विविध पोलीस ठाण्यात 3 ते 5 बाईक चोरीच्या घटनांची नोंद होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे उल्हासनगर पोलीस परिमंडळाचे पोलीस उप-आयुक्त प्रशांत मोहीते यांनी विविध पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले.

सापळा रचून चोराला केली अटक-

विठठ्लवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.पी. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपुत, ज्ञानेश्वर मोरे, रोहिदास बुधवंत, समिर गायकवाड, हनुमंत सानप, कृपाल रोकडे, मंगेश वीर यांच्या पथकाने कारवाई केली. या पथकाला चार दिवसांपूर्वी खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. की उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील मानेरागांव कमानीजवळ एक जण चोरीची गाडी घेवून उभा आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून चोराला अटक केली.

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यत या चोरट्याकडून 2 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच चोरट्याकडून आणखी काही बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सहायक पोलीस आयुक्त डी. डी.टेळे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- शेतकर्‍यांना खलिस्तानवादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले? निर्णय न झाल्यास केंद्राविरोधात देश पेटवू...

हेही वाचा- उर्मिला मातोंडकर शिवसेना पक्षप्रवेश : "मी जन्माने आणि कर्माने हिंदू"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.