ETV Bharat / state

Thane RTO Decision: विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना आता शासकीय, खासगी आस्थापनामध्ये 'नो एन्ट्री'! ठाणे आरटीओचा निर्णय

विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना आता शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये 'नो एन्ट्री' करण्यात आली आहे. दुचाकी चालवताना सुरक्षेच्या हेतूने हेल्मेट घालणे बंधनकारक करण्याचा दृष्टीने ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) परिपत्रक काढले आहे.

Thane RTO Decision
ठाणे आरटीओचा निर्णय
author img

By

Published : Jun 15, 2023, 8:38 PM IST

ठाणे : आरटीओ विभागाच्या नवीन परिपत्रकानुसार, सर्व शासकीय कार्यालये आणि खासगी आस्थापनात दुचाकीवरून येणाऱ्यांनी हेल्मेट घालणे सक्तीचे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी गृहनिर्माण सोसायटीसमोर यासंदर्भात जनजागृतीपर फलक देखील लावण्यात येणार आहेत.

या कारणामुळे हेल्मेटसक्ती: ठाणे शहरात दिवसागणिक वाहनांची संख्या वाढत असून रस्ते अपुरे पडत आहेत. रस्ते अपघाताच्या संख्येत दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. त्यात विना हेल्मेट दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे एका अहवालात सांगण्यात आले आहे. रस्ते अपघातात हेल्मेट परिधान केलेले नसणे हे मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा, सुरक्षेसाठी हेल्मेट परिधान करणे महत्त्वाचे ठरत आहे. याची पहिली अंमलबजावणी शासकीय कार्यालयात करण्यात येणार आहेत.

लावले जाणार फलक: हेल्मेट असेल तरच प्रवेश, असे फलक प्रादेशिक परिवहन विभागाने तयार केले आहेत. हेल्मेट संदर्भात परिपत्रक सर्व शासकीय कार्यालयात दिलेले आहेत. सोबत खासगी कंपनी, कारखाने आदी आस्थापने यांनाही दिली गेली आहेत. मोटर वाहन कायदा १९८८ मधील कलम १९४-ड तरतूदी नुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदीचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. जास्तीत जास्त दुचाकी स्वरांनी हेल्मेट घालावे या करिता गृहनिर्माण सोसायटी यांना देखील या बाबतचे फलक दिले जाणार आहेत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.

दंड करण्यापेक्षा सुरक्षा महत्त्वाची: परिवहन विभागाकडून सुरू केलेल्या या नवीन उपक्रमांमध्ये नागरिकांना दंड आकारून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे; मात्र मूळ उद्देश हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाची सुरक्षा हा आहे. दंड आकारल्यामुळे पुन्हा अशा प्रकारे विना हेल्मेट प्रवास करण्यासाठी एक भीती निर्माण होऊ शकते. म्हणूनच परिवहन विभागाकडून हा उपक्रम राबवला जाणार आहे.

मुंबई आरटीओचा निर्णय: बाईकवर प्रवास करणाऱ्या रायडरसह मागे बसणाऱ्याला व्यक्तीला देखील हेल्मेट घालणे सक्तीची असणार आहे. अन्यथा वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई आरटीओ विभागाद्वारे काढण्यात आलेल्या परिपत्रक म्हटले गेले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.