ठाणे - भिवंडी परिमंडळ-२ पोलीस उपायुक्त परिक्षेत्रातील कोनगाव, शांतीनगर, निजामपूरा आणि भोईवाडा अशा ४ पोलीस ठाण्यांतर्गत ७ सराईत गुन्हेगारांना तडीपार घोषीत केले आहे. /यामध्ये आकाश राजेश कंडारे (२५), लुकमान अब्दुल रहीम अन्सारी (२६), निजाम उर्फ गुड्डू नियाज अहमद अन्सारी (४०), गयासुद्दीन उर्फ गॅसु असगरअली खान (२७), जहांगीर दाऊद शेख (३२), आसिफ मोईनुद्दीन अन्सारी (२५), शहजाद उर्फ शहदाद उर्फ शहजात उर्फ साजाद मन्सूर मोमीन (३१ सर्व रा. भिवंडी) अशी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी हद्दपार केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत.
मुंबई उपनगरे अशा विविध जिल्ह्यांतून हद्दपार - कोनगाव पोलीस ठाण्यातर्गत आकाश यास २ वर्ष, शांतीनगर पोलीस ठाण्यातर्गत लुकमान यास १ वर्ष तर निजाम, गयासुद्दीन, जहांगीर या तिघांना १८ महिन्यांसाठी तर भोईवाडा पोलीस ठाण्यातर्गत आसिफ यास १ वर्ष तसेच निजामपूरा पोलीस ठाण्यातर्गत शहजाद उर्फ शहदाद यास २ वर्ष याप्रमाणे त्यांनी केलेल्या गुन्ह्यानुसार ठाणे, बृहन्मुंबई, पालघर, रायगड, नवी मुंबई, मुंबई उपनगरे अशा विविध जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे.
गुन्हेगारांवर आळा घालायचा प्रयत्न - या सर्व ७ सराईत गुन्हेगारांवर भिवंडीतील ४ पोलीस ठाण्यांतर्गत विविध प्रकारचे ३७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शहरात वाढत्या चोरीच्या गुन्ह्यांचा आलेख पाहता या सातही सराईत अट्टल गुन्हेगारांना हद्दपार करून गुन्हेगारांवर आळा घालायचा प्रयत्न केले आहे.