ETV Bharat / state

Bhiwandi Crime : गर्लफ्रेंडवरून महाविद्यालयीन वर्गमित्रामध्ये राडा; एकाने फोडले दुसऱ्याचे डोके

author img

By

Published : Feb 1, 2022, 10:39 PM IST

अकरावी वर्गात शिकणाऱ्या वर्गमित्राने आपल्या गर्लफ्रेंडचे नाव दुसऱ्या मित्राला सांगितल्याच्या वादातून जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. या राडेबाजी वेळी हॉटेलवर चर्चा करण्यासाठी बोलावून एका मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याला जबर मारहाण ( Bhiwandi Crime ) केली आहे. याप्रकरणी भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात ( Bhoiwada Police Station ) चार राडेबाज मित्रांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

पोलीस ठाणे
पोलीस ठाणे

ठाणे - अकरावी वर्गात शिकणाऱ्या वर्गमित्राने आपल्या गर्लफ्रेंडचे नाव दुसऱ्या मित्राला सांगितल्याच्या वादातून जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. या राडेबाजी वेळी हॉटेलवर चर्चा करण्यासाठी बोलावून एका मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याला जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात ( Bhoiwada Police Station ) चार राडेबाज मित्रांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

वाद मिटविण्यासाठी बोलवून पुन्हा घातला वाद - पोलीस सूत्राने दिलेल्या माहिती नुसार कोकण मुस्लीम एज्युकेशन सोसायटीकॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलगा व संशयित असलेले मुले हे वर्गमित्र आहेत. 31, जानेवारीला दुपारच्या सुमारास महाविद्यालयात एका वर्गमित्राने दुसऱ्या वर्गमित्राला संशियताच्या गर्लफ्रेंडचे सांगितले. त्यामुळे ज्याने नाव सांगितले व ज्याच्या गर्लफ्रेंडचे नाव सांगितले या दोघांचे भांडण झाले होते. भांडण मिटविण्यसाठी राडेबाजांनी त्या मुलाला भिवंडीतील कारीवली रोडवरील आजमी हॉटेलजवळ रात्री साडेआठच्या सुमारास बोलावले होते.

दगड डोक्यात मारल्याने तो मुलगा गंभीर जखमी - आजमी हॉटेलजवळ रात्री 8 वाजण्याच्या सुमारास भांडण मिटवण्याच्या उद्देशाने तो मुलगा गेला असता त्याठिकाणी संशयित एकत्रित होते. मुख्य संशयित आरोपीने 'तु माझ्या गर्लफ्रेंडचे नाव का सांगितले', असे म्हणत पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुख्य संशयित आरोपी साद कुंगलेने त्याठिकाणी पडलेला दगड उचलून मुलाच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले.

अद्यापपर्यंत एकही संशयित आरोपी अटकेत नाही - या प्रकरणी जखमी मुलाने भोईवाडा पोलीस ठाण्यात चार मित्रांविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अजून कोणासही अटक करण्यात आली नाही. या प्रकरणातील संशयित आरोपी व जखमी मुले ही सज्ञान आहेत की अल्पवयीन आहेत, याबाबतचा खुलासा पोलिसांनी दिला नसून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. मागाडे हे करत आहेत.

हेही वाचा - चालक लघुशंका करताना अल्पवयीन चोराने पळवली कार; २४ तासात आरोपी ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.