ETV Bharat / state

भिवंडीत उच्चभ्रू वसाहतीमधील साडेपाच हजार मतदार करणार 'नोटा' ला मतदान

व्हराळदेवी तलावासमोरच मानसरोवर नावाची मोठी उच्चभ्रू वसाहत असून या वसाहतीशेजारी महापालिकेकडून प्रस्तावित मल निस्सारण केंद्राला मंजुरी दिली आहे. तेव्हापासूनच या प्रस्तावित मल निस्सारण केंद्राला स्थानिक रहिवाशांनी विरोध करीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा निषेध केला आहे.

पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ 'मानसरोवर बचाव अभियान' असे बॅनर रहिवाशांनी लावले आहे.
author img

By

Published : Apr 20, 2019, 12:50 PM IST

ठाणे - भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसरोवर येथील रहिवाशांनी महापालिकेकडून प्रस्तावित असलेल्या मल निस्सारण केंद्राला विरोध करीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा निषेध केला आहे. या निषेधार्थ 'मानसरोवर बचाव अभियान' असे बॅनर परिसरात लावून यंदाचे मतदान 'नोटा'ला करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे युती-आघाडीच्या उमेदारांना त्याचा फटका बसणारा असल्याचे बोलले जात आहे.

पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ 'मानसरोवर बचाव अभियान' असे बॅनर रहिवाशांनी लावले आहे.

भिवंडी शहर यंत्रमागनगरी म्हणून ओळखले जाते. या शहरात दाटीवाटीने कामगारांच्या चाळी, झोपड्यात लाखोंच्या संख्येने कामगार वर्ग राहतो. तर मानसरोवर, मिल्लत नगर, पटेल कंपाऊंड, धामणकर नाका, गोकुळनगर अंजूरफाटा ओसवालवाडी हा परिसर उच्चभ्रू वसाहतीमध्ये गणला जातो. मात्र, पालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरातील बहुंताश भागात आरोग्य, कचरा, पाणी, अशा नागरी मूलभूत सुविधेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. त्यातच व्हराळदेवी तलावासमोरच मानसरोवर नावाची मोठी उच्चभ्रू वसाहत असून या वसाहतीशेजारी महापालिकेकडून प्रस्तावित मल निस्सारण केंद्राला मंजुरी दिली आहे. तेव्हापासूनच या प्रस्तावित मल निस्सारण केंद्राला स्थानिक रहिवाशांनी विरोध करीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा निषेध केला आहे.

विशेष म्हणजे या परिसरात तब्बल साडेपाच हजार रहिवासी राहत आहेत. मल निस्सारण प्रकल्प उंचावर न करता खोलगट भागात करा, या प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका आहे. तर या प्रकल्पातील सांडपाणी व्हराळदेवी तलावात जाण्याची शक्यता आहे. अशी कारणे पुढे करीत येथील रहिवाशांनी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या विरोधात निषेध व्यक्त करीत 'मानसरोवर बचाव अभियान' असे बॅनर परिसरात लावून यंदाचे मतदान 'नोटा'ला करणार असल्याचा निर्णय घेतल्याने शहरात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

भिवंडीत उच्चभ्रू वसाहतीमधील तब्बल साडेपाच हजार मतदारांचा “नोटा”ला मतदानाचा निर्णय  

ठाणे :- भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रातील उच्चभृ वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसरोवर येथील रहिवाशांनी महापालीकेकडून प्रस्तावित असलेल्या  मल निस्सारण केंद्राला विरोध करीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा निषेध केला. या निषेधार्थ मानसरोवर बचाव अभियान असे बॅनर परिसरात लावून यंदाचे मतदान  नोटा”ला करणार असल्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे युती-आघाडीच्या उमेदारांना त्याचा फटका बसणारा असल्याचे बोलले जात आहे.

भिवंडी शहर यंत्रमाग नागरी म्हणून ओळखले जाते, या शहरात दाटीवाटीने कामगारांच्या चाळी, झोपड्यात लाखोंच्या संख्येने कामगार वर्ग राहतो. तर  मानसरोवर, मिल्लत नगर,  पटेल कंपाऊंड, धामणकर नाका, गोकुळनगर अंजूरफाटा ओसवाल वाडी, हा परिसर उच्चभ्रू वसाहतीमध्ये गणला जातो. मात्र पालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरातील बहुंताश भागात आरोग्य, कचरा, पाणी, अश्या नागरी मूलभूत सुविधेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. त्यातच व्हराळदेवी तलावासमोरच मानसरोवर नावाची मोठी उच्चभ्रू वसाहत असून या वसाहती शेजारी महापालीकेकडून प्रस्तावित मल निस्सारण केंद्राला मंजुरी दिली आहे. तेव्हापासूनच या प्रस्तावित मल निस्सारण केंद्राला स्थानिक रहिवाशांनी विरोध करीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा निषेध केला.

विशेष म्हणजे या परिसरात तब्बल साडेपाच हजार रहिवाशी राहत आहे.  मल निस्सारण प्रकल्प उंचावर न करता खोलगट भागात करा, या प्रकल्पामुळे स्थानिक  रहिवाश्यांच्या  आरोग्याला धोका आहे. तर या प्रकल्पातील सांडपाणी व्हराळदेवी तलावात जाण्याची शक्यता आहे. अशी कारणे पुढे करीत येथील रहिवाशांनी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या विरोधात निषेध  व्यक्त करीत मानसरोवर बचाव अभियान असे बॅनर परिसरात लावून यंदाचे मतदान  नोटा”ला करणार असल्याचा निर्णय घेतल्याने शहरात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.