ETV Bharat / state

नवी मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भूमिगत गटारांच्या सफाईला सुरुवात; अनेक गटारांवरील झाकणं गायब - underground sewers cleaning

नवी मुंबईत भूमिगत गटारे मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, कित्येक गटारांची झाकणे गायब झाली आहेत. याकडे पालिकेचे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळत आहे.

गटारे उघडी
गटारे उघडी
author img

By

Published : May 12, 2021, 10:12 PM IST

नवी मुंबई - शहरात असणारी कमी जागा यामुळे भूमिगत गटारांची निकड वाढत आहे. नवी मुंबई शहरात दिवसागणिक नागरिकांची गर्दी वाढत आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर नवी मुंबई शहर असल्याने येथे राहण्यास नागरिक प्रथम पसंती देत असतात. सिडकोने वसवलेले शहर म्हणून नवी मुंबई शहर हे सुनियोजित शहर आहे. त्यामुळे येथे भूमिगत गटारे मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, कित्येक गटारांची झाकणे गायब झाली आहेत. याकडे पालिकेचे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - Mucormycosis : महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचा कहर, राज्यभर सापडत आहेत रुग्ण

स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशात तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन -

स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळे येथे भूमिगत गटारांची विशेष काळजी घेतली जात आहे. वेळोवेळी गटारे साफ करण्यात येत असल्याने येथे गटारे तुंबणे, दुर्गंधी होणे या सारख्या समस्या पाहायला कमी मिळत आहेत. सद्यस्थितीत शहरात भूमिगत गटारांची सफाई ही यांत्रिक पद्धतीने करण्यात येत आहे. गटारात उतरून विषारी वायू पसरल्याने सफाई करणाऱ्या लोकांचे मृत्यू होणे, बेशुद्ध पडणे या सारख्या समस्यांमुळे यंत्रांच्या सहाय्याने भूमीगत गटारांची सफाई करत असल्याची माहिती नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगाने भूमिगत गटारांच्या सफाईकडे विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी भरू नये म्हणून गटारे व नालेसफाईला सुरुवात

पावसाळ्यात नाले व गटारे साफ न केल्याने शहरात पाणी साचणे व पूरस्थिती निर्माण होणे या सारख्या घटना घडू शकतात, म्हणून त्या अनुषंगाने नवी मुंबई शहरात दरवर्षी उन्हाळ्यात नालेसफाईला सुरुवात होते. त्याप्रमाणे याही वर्षी शहरात नालेसफाई होत आहे.

नवी मुंबई शहरातील कित्येक गटारे अजूनही उघडी -

नवी मुंबई शहरातील बऱ्याच ठिकाणी गटारे उघडी पाहायला मिळतं आहेत. कित्येक चेंबरची झाकणे गायब झाल्याची स्थिती आहे. ही स्थिती नेरुळ, बेलापूर, तुर्भे गाव व टेकडी झोपडपट्टीमध्ये दिसत आहे. उघडे नाले व गायब झालेली गटारांची झाकणे याकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे. तसेच या गटारांची सफाई झाली नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - मुंबईत १११ म्यूकर मायकोसिसचे रुग्ण; बहुतांश रुग्ण मुंबई बाहेरील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.