ठाणे - गडकरी रंगायतन समोरील बस स्थानकावर सी. आर सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी नाना ऊर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे म्हणजेच छोटा राजन या गुंडाला बॅनर लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - हे सरकार 'टेंपररी', आम्ही पुन्हा सत्तेवर येणारच! नारायण राणेंचा ठाण्यात एल्गार..
छोटा राजनला 13 जानेवारीला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रकाश भालचंद्र शेलटकर, संगीता ताई शिंदे, राजाभाऊ गोळे, हेमचंद्र उर्फ दादा मोरे अशी नावे या बॅनरवरती आहेत. छोटा राजन हा वरिष्ठ पत्रकाराच्या हत्येप्रकरणी तसेच हत्या, खंडणी, धमकावणे अशा अनेक गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांत फरार होता. त्यानंतर त्याच्या मुसक्या परदेशात आवळण्यात आल्या होत्या. सध्या छोटा राजन देशातील सर्वात मोठ्या आणि सुरक्षित तिहार तुरुगांत आहे. तसेच अनेक प्रकरणात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला सुणावणीस हजर राहावे लागते.