ETV Bharat / state

भुयार खोदून बँक लुटणाऱ्या टोळीतील म्होरक्याला भिवंडीतून अटक; ३ आरोपींकडून २८ गुन्ह्यांची उकल - arrested

विशेष म्हणजे नवी मुंबई येथे बँक ऑफ बडोदाच्या शाखेत भूयार खोदून लॉकरमधील मुद्देमाल चोरीतील प्रमुख सूत्रधार दीपक दयाराम मिश्राला भिवंडीतून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे

भुयार खोदून बँक लुटणाऱ्या म्होरक्याला भिवंडीतून अटक
author img

By

Published : Apr 14, 2019, 9:35 AM IST

ठाणे - घरफोडी, वाहन चोरी आणि चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलीस पथकाने ३ आरोपींना पकडले असून त्यांच्याकडून तब्बल २८ गुन्ह्यांची उकल करीत ४२५ ग्रॅम सोन्याचे दागिने, सात दुचाकी, दोन मोबाईल आणि घरफोडीतील सिगरेट असा १८ लाख ४७ हजार ८७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विशेष म्हणजे नवी मुंबई येथे बँक ऑफ बडोदाच्या शाखेत भूयार खोदून लॉकरमधील मुद्देमाल चोरीतील प्रमुख सूत्रधार दीपक दयाराम मिश्राला भिवंडीतून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रमुख सूत्रधार आणि सराईत गुन्हेगार दीपकने फरार असलेल्या काळात अनेक ठिकाणी केलेल्या इतर ५ घरफोडीच्या घटनांची उकल त्याच्या अटकेने झाली असून त्याच्या जवळून २०३ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

भुयार खोदून बँक लुटणाऱ्या म्होरक्याला भिवंडीतून अटक

नारपोली येथील एका चैन स्नॅचिंगच्या घटनेचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुरी नगर भिवंडी येथील पपलु इम्तियाज अन्सारी या आरोपीस अटक केली. नागाव भिवंडी येथील इमरान उर्फ इसाक इस्माईल शेख या सराईत वाहन चोरासही अटक केली असून त्याच्याकडून नारपोली, शांतीनगर, मुंब्रा, श्रीनगर, हिललाईन या पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या सात वाहन चोरीचा छडा पोलिसांनी लावला आहे. भिवंडी गुन्हे शाखेचे शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी पथकाने मिळून एकूण २८ गुन्ह्यांची उकल केली.

भुयार खोदून बँक लुटणाऱ्या  म्होरक्याला भिवंडीतून अटक; तर तिघा आरोपीं कडून २८ गुन्ह्यांची उकल  

ठाणे :-घरफोड्यांसह वाहन चोरी, चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळ्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या पोलीस पथकाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून  त्यांच्याकडून तब्बल 28 गुन्ह्यांची उकल करीत ४२५ ग्राम सोन्याचे दागिने, सात दुचाकी, दोन मोबाईल व घरफोडीतील सिगरेट असा 18 लाख 47 हजार 874 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशी माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

विशेष म्हणजे नवी मुंबई येथे बँक ऑफ बडोदाच्या शाखेत भूयार खोदून लोकर मधील मुद्देमाल चोरीतील प्रमुख सूत्रधार दीपक दयाराम मिश्रा यास भिवंडीतून अटक करण्यात यश मिळविले आहे. प्रमुख सूत्रधार दीपक हा सराईत गुन्हेगाराने फरार असलेल्या  काळात  त्याने ठिकठिकाणी केलेल्या इतर पाच घरफोडीच्या घटनांची उकल त्याचे अटकेने झाली असून त्याच्या जवळून  २०३ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ,

तर नारपोली येथील एका चैन स्नॅचिंगच्या घटनेचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुरी नगर भिवंडी येथील फैयाज उर्फ पपलु इम्तियाज अन्सारी या आरोपीस अटक केली. त्याने ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातही विविध पोलीस ठाण्यात दाखल दहा चैन स्नॅचिंग व दोन मोबाईल स्नॅचिंग या गुन्ह्यांचा छडा लावला असून, त्याने सदरच्या चोरीतील सोन्याचा मुद्देमाल गैबी नगर येथील मुस्कान ज्वेलर्स च्या मालक रंजन वाहिद शेख यास सुध्दा  ताब्यात घेत सोन्याचे २२३ ग्राम वजनाचे दागिने हस्तगत केले.

नागाव भिवंडी येथील इमरान उर्फ इसाक इस्माईल शेख या सराईत वाहन चोरास अटक केली. त्याच्या कडून नारपोली, शांतीनगर, मुंब्रा, श्रीनगर, हिललाईन या पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या सात वाहन चोरीचा छडा पोलिसांनी लावला असून भिवंडी गुन्हे शाखेचे शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सपोनि महेंद्र जाधव, पोउपनि रवींद्र पाटील, संतोष चौधरी, लक्ष्मण जोरी,  सह पोउपनि भोलानाथ शेळके ,सुभाष अहिरे ,लतीफ मन्सुरी ,पोहवा सुधाकर चौधरी, विकास लोहार, विष्णू सातपुते, रवींद्र पाटील, किशोर माने, नवनाथ पारधी, दिलीप शिरसाठ, रमेश शिंगे, विकास शिरसाठ राजेंद्र आल्हाट, आदी  पोलीस अधिकारी ,कर्मचारी यांच्या पथकांनी मिळून  एकूण 28 गुन्ह्यांची उकल करीत त्यामधून  13 लाख रुपये किमतीचे 425 ग्राम वजनाचे सोन्याचे 4, लाख 27 हजार ,874  रुपये किमतीचे सिगारेट, एक लाख रुपय किमतीची सात दुचाकी वाहने, दोन मोबाईल वीस हजार रुपये अशी एकूण 18, लाख 47, हजार 874 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.