ETV Bharat / state

Thane Crime : बांगलादेशी नागरिकाला भिवंडीतील निर्यात कंपनीतून अटक - Bangladeshi national arrested

भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील निर्यात कंपनीत काम करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. तो वैध कागदपत्रांशिवाय ओळख लपवत छुप्या मार्गाने भारत-बांगला सीमेवरून भारतात येऊन भिवंडीत वास्तव्य करीत होता. पोलिसांनी त्याच्यावर पासपोर्ट कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मो.अबू ताहेर मोहम्मद.मुफझल हुसेन (४२) असे अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे.

Thane Crime
बांगलादेशी नागरिकाला अटक
author img

By

Published : Feb 6, 2023, 10:24 PM IST

ठाणे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ बांगलादेशी मो.अबू ताहेर मोहम्मद.मुफझल हुसेन राहत होता. तालुक्यातील दापोडा रोड येथील प्रितेश कॉम्प्लेक्समधील रिबन एक्स्पोर्ट कंपनीत काम करतात. या प्रकाराची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकाने या कंपनीवर छापा टाकून बांगलादेशी घुसखोर मोहम्मद याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याचे मूळ गाव बूट बाजार बांगलादेश (जि. गाझीपूर) असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

बांगलादेशीला अटक : मुफझल हुसेनने भारताच्या बंगालच्या अवैध मार्गाने पासपोर्ट व्हिसाशिवाय गुप्तपणे भारतात प्रवेश केला होता. भारतीय नागरिकत्वाशिवाय येथे काम करत असल्याचे आढळून आले आहे. त्याच्यावर नारपोली पोलीस ठाण्यात पासपोर्ट नियम १९५० चे कलम ३ (अ), ६ (अ) आणि फॉरेनर्स ऍक्ट १९४६ चे कलम १४(अ), अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास नारपोली पोलीस करत आहेत.

पोलिसांच्या चिंतेत वाढ : भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शहरातील शांतीनगर, नारपोली आणि भिवंडी शहर पोलिसांनी २०२१ साली छापेमारी करून तब्बल ४० बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. विशेष म्हणजे, यापैकी भिवंडीतील अवनी टेक्सटाईल्समध्ये काम करणाऱ्या ९ बांग्लादेशी नागरिकांना कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यामुळे भिवंडी आणि आसपासच्या भागात आणखीही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. आता पुन्हा शहरात बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य दिसून आल्याने ठाणे व मुंबई जिल्ह्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हावडामार्गे देशभरात पसरतात : बांगलादेशी नागरिक भारताचा अधिकृत पारपत्र, भारत देश किंवा बांगलादेशाचा विजा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने दलालांची मदत घेऊन भारतात येतात. बांगलादेशातून हावडा रेल्वे स्टेशन येथे येऊऩ रेल्वेने प्रथम कल्याण आणि नंतर जिल्ह्यातील इतर शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास राहत असल्याचे यापूर्वीच्या छापेमारीत उघड झाले आहे.

हेही वाचा : Nashik Crime : धक्कादायक! अंधश्रद्धेचे वास्तव पुन्हा एकदा समोर; भुताटकीच्या आरोपामुळे कुटुंबांना गाव सोडण्यास पाडले भाग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.