मुंबई : एरवी या वयामध्ये मुलं आणि मुली टीव्ही पूढे किंवा मोबाईल हातात घेऊन फावला वेळ घालवत असतात. मात्र नील शेकटकरला लहानपणापासूनच पाण्याची व पोहण्याची आवड असल्यामुळे त्याने फावला वेळ घालवला नाही. तर नील (Neel Shekatkar) या बारा वर्षीय मुलाने साडेपाच तासामध्ये 26 किलोमीटर अंतर बॅकस्ट्रोक रीतीने, बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान पोहत 2 एप्रिल 2022 रोजी पार (set unique record of reverse swimming in sea) केले. Balveer Neel Shekatkar
नील हा अत्यंत वाकबगार आहे. त्याला विचारल्यावर त्यांनी सांगितले की, 'तुमचा सराव, तुमची प्रॅक्टिस हेच तुम्हाला परफेक्ट बनवते. आणि मी लहानपणापासूनच हा सराव करायचा म्हणजे फादर एंगल्स यांच्या स्विमिंग पूल मध्ये किंवा खुल्या वातावरणातील समुद्रात म्हणजे उरणला, बेलापूरला समुद्रामध्ये सकाळी, दुपारी, संध्याकाळी अशा वेगवेगळ्या कालावधीमध्ये मी सराव केला होता. अशा सरावामुळे होता पोहता कधी खांदा पण दुखायचा मी रडायचो. पालक धीर द्यायचे आणि प्रेरणा द्यायचे. त्यांनी दिलेल्या हिमतीनेच मी हा विक्रम केल्याचे नील आदाराने सांगतो. नीलच्या नावाची नोंद इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.
याबाबत त्याचे वडील सचिन शेकटकर 'ई टीव्ही' सोबत बातचीत करताना म्हणाले की, 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, ही आपली महाराष्ट्राची म्हण आहे. तसेच आमच्या मुलाचे पाय, मात्र पाण्यात दिसले. कारण चार वर्षाचा असताना त्याने उरणला समुद्रात पोहण्याचा प्रयत्न केला होता. आणि ते आम्ही पाहिलं. आम्ही त्याची आवड लक्षात घेतली आणि त्याला प्रोत्साहन दिलं. त्याच्यामध्ये एक गुण आहे. तो सातत्य राखून सराव करतो. त्यासाठी मेहनत घेतो. त्यासाठी सर्व प्रकारचे कष्ट घेतो. आहारावर देखील तो नियंत्रण ठेवतो. आम्हाला देखील त्याचा विश्वास बसला नाही की, तो असा विक्रम करू शकेल.' तसेच त्याची आई हेमांगीने पण सांगितलं की, 'आम्ही त्याच्या आहाराबाबत खूप काळजी घ्यायचो. आहार तज्ञ यांच्या सल्ल्याने कोणता आहार कसा द्यावा ? याबाबत आम्ही खूपच काळजी घेतली.'
तर नीलचे प्रशिक्षक गोकुळ कामत आणि अमित आवळे यांनी सांगितलं की, 'नील ने स्विमिंग पूल मध्ये जो सराव केला आणि उरण किंवा बेलापूर या समुद्रामध्ये जो सराव केला. त्या प्रत्येक वेळेला आम्ही मार्गदर्शन करतच होतो. मात्र त्याच्या आई-वडीलांनी त्याला खूप साथ दिली. तो सातत्याने रोज सहा सात तास बॅकस्ट्रोक पोहण्याचा सराव करायचा. सरावामुळे तो अत्यंत निष्णात असा जलतरणपटू झाला. Balveer Neel Shekatkar