ठाणे : आज सकाळच्या सुमारासही मध्य रेल्वेच्या बदलापूर ते अंबरनाथ दरम्यानच्या अपमार्गावर मालगाडी बंद पडली होती. मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने अप मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर रेल्वे रुळावरुन बंद पडलेले इंजिन बाजूला करण्यात आले. त्यानंतर तेथील मार्ग मोकळा करण्यात आला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून एक पर्यायी इंजिन कल्याण स्थानकातून पाठवण्यात आल्यानंतर मालगाडी पुढे ढळाली. त्यानंतर बदलापूर ते अंबरनाथ दरम्यानची रेल्वे वाहतूक सुरळीत चालू झाली आहे. परंतु रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या खोळंबल्या असून चाकरमान्यांना कामावर पोहचण्यासाठी उशीर होणार आहे. मालगाडीचे इंजिन खराब झाल्यामुळे मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. दरम्यान ठाणे, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, कासारावरुन, लोकल चालू आहेत. कर्जत- कल्याण लोहमार्गावर
चारमानी संतापले : कामावर पोहचण्यास उशीर होत असल्याने चाकरमानी संताप व्यक्त केला. मध्य रेल्वेचे रडगाणे कधी थांबणार, अशी ओरडही नागरिकांनी यावेळी केली. आज सोमवारी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी मुंबईकडे मालवाहू रेल्वे जात होती. ही रेल्वे बदलापूर आणि अंबरनाथ अप मार्गाहून जात होती. परंतु इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तेही सकाळी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवासी खोळंबले होते.
वेळापत्रक बिघडले : मालवाहू रेल्वे बंद पडल्यामुळे एकामागे एक अशा लोकलच्या रांगा लागल्या होत्या. अप मार्गावरील लोकल सेवा आणि मेल एक्सप्रेस सेवांची वाहतूक कर्जत ते बदलापूरच्या दरम्यान पूर्णपणे ठप्प झाली होती. आधीच मेल एक्सप्रेस आणि मालगाडी यांना प्रथम प्राधान्य दिल्याने लोकल गाड्यांचे वेळापत्रक बिघडत असते. परिणामी चाकरमान्यांना दररोज कार्यालयात पोहोचण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे आधीच प्रवाशांमध्ये नाराज झाले होते. आता मालगाडीमुळे रेल्वेसह चाकरमान्यांचे वेळापत्रकव बिघडले आहे. बदलापूरला जाणाऱ्या लोकल गाड्या अंबरनाथला थांबवल्या जात आहेत, आणि तेथूनच त्या सीएसटीकडे पाठवल्या जात आहेत.
हेही वाचा -