ठाणे - कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. त्यामुळे अनेकांना घरी बसावे लागले होते. मात्र या संधीचा फायदा घेत डोंबिवली येथील तरूणीने एक आगळावेगळा छंद जोपासला. या तरूणीने पिंपळाच्या पानांवर विविध सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, सामाजिक सण, उत्सव, प्रबोधक यांची चित्रे कोरून रेखाटली आहेत. दसऱ्याच्या निमित्ताने तिने चक्क एका पिंपळाच्या पानावर रावण दहनाचे चित्र कोरून रेखाटले आहे. जाणून घेऊया या अवलिया कलाकाराबद्दल ईटीव्ही भारतच्या या खास रिपोर्टमध्ये....
साडे पाचशेच्यावर पिंपळाच्या पानांवर कोरून रेखाटली विविध प्रतिकृत्या -
श्रद्धा पाटील असे या तरुणीचे नाव असून तिने उत्तमरित्या भितींवर चित्र रेखाटण्याचे एका आर्ट स्कुलमधून प्रशिक्षण घेतले आहे. देशभरात दसऱ्या दिवशी रावण दहनाची प्राचीन काळापासून परंपरा आहे. त्यामुळे आजच्या दिवशी विविध पद्धतीने रावण दहन करून दसरा सण साजरा करण्यात येतो. अश्यात डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसरात राहणाऱ्या श्रद्धा पाटील या तरुणीने एका पिंपळाच्या पानावर रावणच दहनचे चित्र कोरून उत्तम प्रकारे रेखाटले आहे. शिवाय आजपर्यत श्रध्दाने साडे पाचशेच्यावर पिंपळाच्या पानांवर विविध राष्ट्रीय पुरुष, देवी देवता, यांच्यासह राजकीय नेत्यांची पानावरचं कोरून प्रतिकृत्या रेखाटल्या आहेत.
लॉकडाऊनच्या वर्षभरात जडला छंद -
लॉकडाऊन पूर्वी श्रद्धाने एका मराठी चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. मात्र लॉकडाऊनचे दीड वर्ष सिनेसुष्टी बंद असल्याने तिने घराच्या घरीच छंद म्हणून पिंपळाच्या पानावर अनेक देवदेवतांच्या प्रतिकृतीसह महापुरुषांच्या प्रतिकृती कोरून साकारल्या आहेत. विशेतः छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह राजकीय नेत्यांच्या प्रतिमा साकारल्या असून दसऱ्या निमीत्ताने दुर्गा माता, आंबे देवी अश्या विविध रूपातील देवींचे अनेक चित्र पिंपळाच्या पानावर कोरले आहे. श्रद्धाच्या मते येणाऱ्या भावी पिडीला किमान आपल्या महापुरुषांच्या जयंतीचे महत्व समजू शकेल यासाठी मी प्रयत्न करीत असल्याचेही तिने सांगितले.
हेही वाचा - लैंगिक शिक्षण ( Sex Education) म्हणजे काय ? सांगताहेत पद्मश्री डॉ. राणी बंग.....