ETV Bharat / state

शिवसेना विभाग प्रमुख अमित जैस्वाल यांच्यावर प्राणघातक हल्ला

ठाण्यात शिवसेनेचे विभागप्रमुख अमित जैस्वाल यांच्यावर काही अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे. हा हल्ला थेट श्रीरंग सोसायटी शाखेतच झाला. सध्या अमित यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Amit Jaiswal
Amit Jaiswal
author img

By

Published : Aug 26, 2021, 1:25 PM IST

ठाणे : ठाण्यातील श्रीरंग सोसायटी विभागातील शिवसेनेचे विभागप्रमुख अमित जैस्वाल यांच्यावर काही अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे. यामुळे ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे हा हल्ला थेट श्रीरंग सोसायटी शाखेतच झाला.

हल्ला इतका भयाकनक की...

अचानक आलेल्या चार ते पाच अज्ञात लोकांनी अमित यांच्या डोक्यावर आणि खांद्यावर ज्याप्रकारे प्राणघातक हल्ला केला, त्यावरून मारेकऱ्यांचा त्यांना ठार मारण्याचाच डाव होता, असा अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस स्थानकात अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्ववैमनस्यातून हल्ला?

अमित जैस्वाल यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्याचे नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित यांची रुग्णालयात भेट देऊन तब्येतीची माहीत घेतली. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा सोडून मुंबईत दाखल, राजकीय घडामोडींना वेग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.