ठाणे - एका लग्नाचा हळदी समारंभ सुरु असतानाच लुटमारीसाठी अज्ञात हल्लेखोरांनी घरात शिरुन तिघांवर प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सुवर्णा चिंतामण घोडे असे प्राणघातक हल्ल्यात मृत महिलेचे नाव आहे. तर भारती जगदीश म्हात्रे आणि पवन जगदीश म्हात्रे हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याणातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
हेही वाचा - पुण्यात 'बर्निंग बस'चा थरार, धावत्या पीएमपीएल बसने घेतला पेट