ETV Bharat / state

'कोणाचा बाप काढायचे काम काँग्रेसने केले नाही' - अशोक चव्हाण बातमी

महाआघाडीचे सरकार आम्ही एका विचाराने स्थापन केले आहे. हे सरकार चालले पाहिजे ही आमची इच्छा आहे. आम्ही पाडापाडी करायला एकत्र आलो नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. ते नवी मुंबईत आयोजित महाआघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

ashok-chavan
अशोक चव्हाण
author img

By

Published : Feb 5, 2020, 7:42 AM IST

नवी मुंबई- आम्ही एका विचाराने महाआघाडीचे सरकार स्थापन केले आहे. आम्ही पाडापाडी करायला एकत्र आलो नाही. कोणाचाही बाप काढायचा अधिकार कोणालाही नाही. कोणाचा बाप काढायचे काम कधीही कॉंग्रेसने केले नाही. ती आमची संस्कृती नाही, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते नवी मुंबईत आयोजित महाआघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

महाआघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्यात बोलताना अशोक चव्हाण

हेही वाचा- विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणवरून उच्च शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरुंना झापले !

महाआघाडीचे सरकार आम्ही एका विचाराने स्थापन केले आहे. हे सरकार चालले पाहिजे, ही आमची इच्छा आहे. आम्ही पाडापाडी करायला एकत्र आलो नाही. शिवसेनाप्रमुखांनी निर्णय घेतला आणि सत्तेत परिवर्तन घडले. जे महाराष्ट्राच्या राजकारणात घडले तेच नवी मुंबईत घडेल, असेही चव्हाण म्हणाले.

भाजपला अजूनही सत्तेची स्वप्ने पडत आहेत. पण त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. नवी मुंबईला चांगला पालकमंत्री मिळाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनी संधीचे सोनं करावे. तसेच दादांनीही विकासासाठी तिजोरीच्या चाव्या मोकळ्या कराव्यात, असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला. नवी मुंबई हे शहर मुंबईच्या बरोबरीने प्रगती करणारे शहर आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष पुरवावे. देशात बुलेट ट्रेनची गरज नाही. लोकल ट्रेन चांगली करावी, असे चव्हाण म्हणाले.

Intro:
कोणाचा बाप काढायची काम काँग्रेसने केली नाही.....- अशोक चव्हाण

नवी मुंबई:

आम्ही एका विचाराने महाआघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. आम्ही पाडापाडी करायला एकत्र आलो, नाही असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नवी मुंबईत महाआघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्यात म्हंटले.

महाआघाडीचे सरकार आम्ही एका विचाराने स्थापन केल आहे.हे सरकार चाललं पाहिजे ही आमची इच्छा आहे.आम्ही पाडापाडी करायला एकत्र आलो नाही. शिवसेनाप्रमुखांनी निर्णय घेतला आणि सत्तेत परिवर्तन घडले.जे महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं तेच नवी मुंबईत घडेल असेही यावेळी चव्हाण म्हणाले. भाजपला अजूनही सत्तेची स्वप्नं पडत आहेत.पण त्यांच स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही.कोणाचाही बाप काढायचा अधिकार कोणालाही नाही. कोणाचा बाप काढायच काम कधीही कॉग्रेसने केलं नाही, ती आमची संस्कृती नाही असेही वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. नवी मुंबईला चांगला पालकमंत्री मिळाला आहे त्यामुळे नवी मुंबईकरांनी संधीचे सोन करावं, तसेच दादांनीही विकासासाठी तिजोरीच्या चाव्या मोकळ्या कराव्यात असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला. नवी मुंबई हे शहर मुंबईच्या बरोबरीने प्रगती करणारे शहर आहे त्याकडेही लक्ष पुरवावे चव्हाण यांनी म्हंटल. देशात.बुलेट ट्रेनची गरज नाही लोकल ट्रेन चांगली करावी.तसेच केंद्रसरकारने सादर केलेल्या बजेटवरही त्यांनी ताशेरे ओढले.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.