ETV Bharat / state

देहव्यापार करणाऱ्या 'त्या' तरुणीवर हत्येपूर्वी बलात्कार; दोघा सख्ख्या भावांना अटक - वेश्येवर बलात्कार आणि खून

भिंवडीमध्ये देहव्यापार करणाऱ्या तरुणीची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्याप्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांनी २४ तासाच्या आत यश आले आहे. तरुणीची हत्या करणारे दोन्ही आरोपी सख्खे भाऊ असल्याचे समोर आले आहे. तसेच या दोघांनीही हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याचेही पोलीस तपासात समोर आले.

arrested two brothers
'त्या' तरुणीवर हत्येपूर्वी बलात्कार;
author img

By

Published : Oct 17, 2020, 10:15 AM IST

Updated : Oct 17, 2020, 11:53 AM IST

ठाणे - भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात देहव्यापर करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात ग्राहकांनी तिच्या राहत्या घरात हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या हत्येचा छडा लावण्यात भिवंडी शहर पोलिसांना चोवीस तासाच्या आत यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यो दोघांनी हत्येपूर्वी तरुणीवर बलात्कार केला. नंतर तिची गळा आवळून हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार २५ वर्षीय तरुणीची भिवंडीतील आसबीबी परिसरात असलेल्या हनुमान टेकडी या भागात राहून देहव्यापार करत होती. गुरुवारी रात्रीच्या सुमाराला या मृत तरुणीच्या खोलीत तीन ग्राहक आल्याची माहिती सांगण्यात आली. त्यामुळे या अज्ञात ग्राहकांवर तिच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत होता. आरोपींनी देहव्यापार करणाऱ्या या तरुणीच्या गुप्तांगास इजा पोहोचवून तिची गळा आवळून हत्या केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा २४ तासाच्या आताच छडा लावला आहे.

पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते दोघे आरोपी सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली. तसेच यामधील मोठ्या भावाचे मृत तरुणीसोबत एकतर्फी प्रेम होते. ती त्याच्या प्रेमाला नकार देत होती. तर दुसरा आरोपी असलेल्या लहान भावाच्या पत्नीशी मृत तरुणीसोबत किरकोळ भांडण झाले होते. या दोन्ही वादातून या दोघा सख्ख्या भावांनी मिळून त्या तरुणीच्या राहत्या घरात प्रवेश केला. तिच्यावर बलात्कार करून तिला इजा केली आणि नंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

दरम्यान, दोघा भावांनी पोलिसांसमोर हत्येची कबुली दिल्याची माहिती भिवंडी झोनचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. या दोन्ही आरोपींना अटक केली असून मृत तरुणी व दोन्ही आरोपी हे एकाच समाजाचे आहेत, तर याप्रकरणी पुढील कारवाई भिवंडी शहर पोलिसांची सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

संबंधित वृत्त वाचा - धक्कादायक ! देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची अज्ञात ग्राहकांकडून हत्या

Last Updated : Oct 17, 2020, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.