ETV Bharat / state

भिवंडी शहरात 1 तर ग्रामीणमध्ये 3 नवीन कोरोना रुग्णांची भर - bhiwandi covid 19 patient

भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या डोहाळे गावातील व्यक्तीसह जुनांदूरखी आणि गुंदवली या गावात प्रत्येकी एक कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती गट विकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिली.

covid 19 in bhivandi
भिवंडी शहरात 1 तर ग्रामीणमध्ये 3 नवीन कोरोना रुग्णांची भर
author img

By

Published : May 12, 2020, 6:35 PM IST

ठाणे - भिवंडी शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसगणिक वाढत असून, तालुक्यात 3 तर शहरात एक नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्याने भिवंडी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 42 वर पोहचली आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या डोहाळे गावातील व्यक्तीसह जुनांदूरखी आणि गुंदवली या गावात प्रत्येकी एक कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती गट विकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिली.

भिवंडी तालुक्यातील रुग्णांची संख्या 29 झाली आहे. तर 9 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने सध्या 20 रुग्ण उपचारासाठी दाखल असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. तर भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात मुंबई येथून निजामपुरा या भागात आलेली एक व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली असून, शहरातील रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली. तसेच एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने शहरातील 22 रुग्ण उपचारासाठी दाखल असल्याची माहिती, आयुक्त आष्टीकर यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.