ETV Bharat / state

Animals Injured Due to Firecrackers : दिवाळीत तुमचा खेळ... प्राण्यांची अशी होते दयनीय अवस्था - प्राणी फटाक्यांनी गंभीर जखमी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी करत असतांना पर्यावरण आणि मुक्या प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले होते, मात्र ठाण्यात फटाक्यांमुळे प्रदूषण आणि त्याचबरोबर अनेक पशु प्राणी जखमी होत असल्याचे समोर येत (Animals Injured Due to Firecrackers) आहे. त्यांच्यावर ठाण्यातील कॅप फाउंडेशनच्या फ्रिडम फार्म या शेल्टरमध्ये सध्या उपचार सुरु (Animals Injured in Thane) आहेत.

Animals Injured Due to Firecrackers
फटाक्यांमुळे अनेक जनावरे जखमी
author img

By

Published : Oct 27, 2022, 1:37 PM IST

ठाणे : तुमचा खेळ होतो मात्र आमचा जीव जातो, अशी भावना दिवाळी सणानिमित्त फटाक्यांमुळे रस्त्यावरील भटक्या प्राण्यांची झाली आहे. यंदा सर्वत्र निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी करत असतांना पर्यावरण आणि मुक्या प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले होते, मात्र ठाण्यात फटाक्यांमुळे प्रदूषण आणि त्याचबरोबर अनेक पशु प्राणी जखमी होत असल्याचे समोर येत (Animals Injured Due to Firecrackers) आहे. त्यांच्यावर ठाण्यातील कॅप फाउंडेशनच्या फ्रिडम फार्म या शेल्टरमध्ये सध्या उपचार सुरु (Animals Injured in Thane) आहेत. यात श्वान आणि मांजरींचा समावेश आहे.

प्राणी फटाक्यांनी गंभीर जखमी : दिवाळी हा आनंदाचा आणि आनंदोत्सव साजरा करण्याचा सण, फटाक्यांमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही याची प्रामुख्याने काळजी आपण घेत असतो. मात्र आपल्या आसपास असणाऱ्या मुक्या प्राण्यांकडे कोणीही लक्ष देत नाहीत. फटाक्यांमुळे जसा आपल्याला त्रास होतो, तसा या मुक्या प्राण्यांना देखील होतो. माणसांना त्रास झाला कि, ते तक्रार करू शकतात. मात्र आपल्या आसपास वावरणारे प्राणी असाह्यपणे भयभीत होण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत. दरवर्षी फटाक्यांमुळे अनेक प्राणी जखमी झाल्याच्या घटना घडत असतात त्याच प्रमाणे या हि वर्षी श्वान, मांजर, पक्षी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ठाण्यातील घोडबंदर येथील प्राणी प्रेमी कॅप फाउंडेशनच्या फ्रिडम फार्मच्या शेल्टरमध्ये या प्राण्यांवर उपचार सुरु आहेत. यात अतिशय गंभीर बाब म्हणजे काही समाजकंठकांकडून जाणून बुजून श्वानांना फटाक्यांनी गंभीर जखमी करण्यात आले आहे. कॅप फाउंडेशनच्या फ्रिडम फार्मच्या शेल्टरमध्ये उपचार घेणाऱ्या एका श्वानाच्या पायाला सुटळी बॉम्ब लावून गंभीर जखमी करण्यात आले आहे. त्यात या श्वानाच्या पायाचा पंजा उपचारादरम्यान काढावा लागला आहे. तर एका श्वानाच्या पाठीवर फुटते फटाके टाकून जखमी केल, असल्याची माहिती कॅप फाउंडेशनचे सदस्य प्रणव त्रिवेदी यांनी दिली (Animals Injured Due to Firecrackers in Thane) आहे.

प्राण्यांची अशी होते दयनीय अवस्था

फटाक्यांच्या आवाजाने प्राण्यांचा मृत्यू : कॅप फाउंडेशन हि पशु प्राणी प्रेमी संस्था आहे. हि संस्था दररोज रस्त्यावर फिरणाऱ्या जखमी भटक्या प्राण्यांवर उपचार करुन त्यांना निवारा देण्याचं काम करते. या संस्थेत १०० तरुण तरुण एकत्रित येऊन भटक्या प्राण्यांना मदत आणि मुक्या प्राण्यांविषयी जनजागृती करण्याचे काम करतात. इतर दिवशी यांना ५० ते ६० जखमी प्राण्यांना मदत करण्यासाठी संपर्क केला जातो. मात्र दिवाळी दरम्यान दररोज या संस्थेला १०० ते १५० श्वान, मांजर व पक्षी फटाक्यांमुळे जखमी झाल्याच्या तक्रारी आणि मदतीसाठी फोन येत असतात. त्याचबरोबर मोठ्या आवाजाच्या फटाक्यांनी भयभीत होऊन श्वान आणि मांजरी सारख्या मुक्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी देखील येत असल्याचं कॅप फाउंडेशनचे सदस्य प्रणव त्रिवेदी (Animals Injured in Thane) सांगतात.

दिवाळी दिव्यांचा सण फटाक्यांचा नाही : दोन वर्षात जोरात होणाऱ्या या दिवाळी या सणात फटाक्यांचा परिणाम मुक्या जीवांना बसतोय, आणि त्यामुळेच सणांचा आपण आनंद दिवे लावून मिठाई वाटून एकमेकांशी चांगले बोलून, अशा रीतीने करावा या उत्साहाचा परिणाम निदान या मुक्या प्राण्यांना त्रास होणार नाही. याची खबरदारी आपण निश्चितच बाळगायला हवी, जेणेकरून त्यांच्या जीवाला धोका पोहचणार (Animals Injured on occasion of diwali) नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.