ETV Bharat / state

खाडी किनारी नवजात अर्भक फेकून अज्ञात फरार; पोलीस शिपायांनी वाचवले बाळाचे प्राण - ठाणे मानपाडा पोलीस

देसाई गावातील रिव्हर वुड पार्क येथील खाडीजवळ बाळ सोडून अज्ञाताने पळ काढला. हे बाळ रडत असल्याचा आवाज मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक निलेश पाटील व पोलीस शिपाई परमेश्वर तिडके यांना ऐकू आला. दोघांनी घटनास्थळी धाव घेत हे बाळ चिखलातून सुखरुप बाहेत काढले.

an-unidentified-fugitive-leaving-a-newborn-on-the-bay-shore-at-thane
खाडी किनारी नवजात अर्भक फेकून अज्ञात फरार
author img

By

Published : Jul 21, 2020, 3:43 PM IST

ठाणे- ठाण्यातील डायघर मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन पोलीस शिपायांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. केवळ एक दिवसाचे असणाऱ्या नवजात अर्भकाचा त्यांनी जीव वाचवला आहे. देसाई गावातील रिव्हर वुड पार्क येथील खाडीजवळ एक नवजात बाळाला सुखरुप वाचवून शीळ डायघर पोलिसांनी नवी मुंबई मधील नेरुळ येथे विश्व बाळ केंद्रात ठेवल आहे. बाळाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक निलेश पाटील व पोलीस शिपाई परमेश्वर तिडके यांनी या बाळाचा जीव वाचवला असून उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे दोन्ही शिपायांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खाडी किनारी नवजात अर्भक फेकून अज्ञात फरार
देसाई गावाजवळ खाडीत एका बाळाचा आवाज येत असल्याची माहिती मिळाल्यावर तत्काळ पोलीस यंत्रणा कामाला लागली. लगेच त्या आवाजाच्या दिशेने त्यांनी धाव घेतली आणि त्या बाळाला अलगद आपल्या हातावर उचलले. जवळच असलेल्या एका महिलेची मदत घेत सुरुवातीला एका खाजगी व नंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बाळावर उपचार करण्यात आले. बाळ सुखरुप असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली आहे.

देसाई गावातील रिव्हर वुड पार्क येथील खाडीजवळ बाळ (मुलगी) सोडून अज्ञाताने पळ काढला. हे बाळ रडत असल्याचा आवाज मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक निलेश पाटील व पोलीस शिपाई परमेश्वर तिडके यांना ऐकू आला. दोघांनी घटनास्थळी धाव घेत हे बाळ चिखलातून सुखरुप बाहेत काढले. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात डायघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास डायघर पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.