ETV Bharat / state

अंबरनाथमधील बारवर पोलिसांचा छापा; ६ बारबालासह २ ग्राहक अन् मॅनेजर ताब्यात - barbala

अंबरनाथ रेल्वे स्थानकासमोर समाधान बारमध्ये महिला वेटर्स बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांसोबत अश्लील कृत्य आणि हावभाव करत असल्याची माहिती मिळाल्यामुळे अंबरनाथ पोलिसांनी या बारवर छापा टाकला.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jul 12, 2019, 9:29 PM IST

ठाणे - अंबरनाथ रेल्वे स्थानकासमोरील समाधान बारवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी बारमधील काही बारबाला ग्राहकांशी अश्लील कृत्य करुन धांगडधिंगा करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी ६ बारबाला आणि २ ग्राहकांसह मॅनेजरला ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जगबीर (२९) गोविंद (२०) असे या २ ग्राहकांचे तर निलेश (२७) असे अटक केलेल्या बार मॅनेजरचे नाव आहे.

अंबरनाथ रेल्वे स्थानकासमोर समाधान बार असून या बारमध्ये कामावर ठेवण्यात आलेल्या महिला वेटर्स बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांसोबत अश्लील कृत्य आणि हावभाव करत असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घुगे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी त्या बारमध्ये छापा टाकला. त्या ठिकाणी महिला वेटर्स ग्राहकांसोबत अश्लील कृत्य करत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी महिला पोलीस नाईक नंदिनी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अंबरनाथ पोलीस ठाण्यात ६ बारबाला आणि २ ग्राहकांसह बार मॅनेजर अशा ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

Intro:किट नंबर 319

Body:डान्स बार मध्ये अश्लील धांगडधिंगा; पोलिसांच्या छाप्यात 6 बारबाला व 2 ग्राहकांसह मॅनेजर ताब्यात

ठाणे :- अंबरनाथ रेल्वे स्थानक समोरील एका वादग्रस्त डान्सबार अंबरनाथ पोलिसांनी छापा टाकल्याची घटना समोर आली आहे, पोलिसांच्या छाप्यावेळी या बारमधील काही बारबाला ग्राहकांशी अश्लील कृत्य करून धांगडधिंगा सुरू असल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांनी 6 बारबाला 2 ग्राहकांसह मॅनेजर विरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले,
अंबरनाथ रेल्वे स्थानका समोर समाधान बार असून या बारमध्ये कामावर ठेवण्यात आलेल्या महिला वेटर्स बार मध्ये येणाऱ्या ग्राहकांसोबत अश्लील कृत्य व हावभाव करीत असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घुगे यांना मिळाली होती त्या माहितीवरून सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी त्या बारमध्ये छापा टाकला त्या ठिकाणी महिला वेटर्स ग्राहकांसोबत अश्लील कृत्य व धांगडधिंगा करीत असल्याचे दिसून आले या प्रकरणी महिला पोलीस नाईक नंदिनी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात सहा बारबाला आणि जगबीर वय 29 गोविंद वय 20 या 2 ग्राहकांसह बार मॅनेजर निलेश वय 27 अश्या 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.