ठाणे : शहापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकसाठी (statue of Dr Babasaheb Ambedkar) गेल्या २५ वर्षांपासून शहापूर तालुक्यातील आंबेडकर अनुयायी शासनाकडे पत्रव्यवहार करून अंदोलन करत आहे. परंतु शासन नेहमी दुर्लक्ष करत आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवल्या जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योतीताई गायकवाड यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. आज त्यांच्या उपोषणाला यश येऊन जिल्हा अधिकारी कार्यलयात नगर पंचायत अधिकाऱ्यांनी पुतळा उभारण्याच्या संदर्भात ठराव मंजूर करून त्याचा प्रस्ताव जिल्हा अधिकाऱ्यांकडे दिला. या प्रस्तावाला अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखविल्याने २५ वर्षाच्या संघर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला (struggle of 25 years erecting statue of Ambedkar) आहे.
पुतळा स्थापनेची मागणी : शहापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबडेकर चौक असून या चौकात बाबासाहेबांचा अर्धकृती पुतळा उभारण्यास शासनाकडे तब्बल पंचवीस वर्षे पत्र व्यवहार करून विविध मार्गाने अंदोलन करण्यात येत होते. मात्र शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा उभारण्यास परवानगी का देत नाही ? हा प्रश्न संपूर्ण डॉ. आंबडेकर जनेतला पडला होता. त्यातच रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेकडून २ डिसेंबर रोजी आमरण उपोषण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा स्थापनेची मागणी करण्यात आली (statue of Dr Babasaheb Ambedkar at Shahapur) होती.
शहापूर बंदची हाक : मात्र २४ तास उलटूनही शासनाचा एकही अधिकारी उपोषण स्थळी फिरकला नसल्याने सोमवारी ५ डिसेंबर रोजी शहापूर बंदची हाक रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने दिल्याने ४ डिसेंबर रोजी शासनाच्या अधिकाराऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभाण्यासाठी ठराव मंजूर करत आमरण उपोषण स्थगित करावे, असे लेखी पत्र दिल्याने उपोषण स्थगित कऱण्यात आले. विशेष म्हणजे ३ डिसेंबर रोजी उपोषणकर्त्यां ज्योती गायकवाड यांची प्रकृतीही खालावली (Dr Babasaheb Ambedkar) होती.
मार्ग मोकळा : दरम्यान, शहापूर न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका दाव्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेल्या शहापूर शहरात त्यांची कीर्ती म्हणून स्मारक करण्याची मागणी गेल्या २५ वर्षापासून होती. आज त्या मागणीचा डॉ. बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला मार्ग मोकळा झाल्याने पाठींबा देणाऱ्या सर्वच राजकीय पक्षासह ५० हुन अधिक सामाजिक संघटनेंचे रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योतीताई गायकवाड यांनी आभार मानले.