ETV Bharat / state

Thane Crime : आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरण; अभिजित पवार याच्यानंतर आव्हाड समर्थक हेमंत वाणी २ वर्षाकरता हद्दपार

ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना हद्दपार होण्याचे आदेश ठाणे पोलिसांनी दिले आहेत. १५ फेब्रुवारी रोजी आयुक्त महेश आहेर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.

author img

By

Published : Jul 15, 2023, 8:38 PM IST

हेमंत वाणी
हेमंत वाणी

ठाणे : ठाणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना केलेली मारहाण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चांगल्याच महागात पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पवार याला ठाणे पोलिसांनी २ वर्षाकरिता हद्दपार केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे कट्टर आव्हाड समर्थक असलेले हेमंत वाणी यांनाही ठाणे पोलिसांनी २ वर्षाच्या हद्दपारीचे आदेश दिले आहेत.

दोन्ही आरोपी हद्दपार : मुख्यालयाच्या समोरच ठाणे महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर याना अभिजित पवार, हेमंत वाणी, खामकर आणि गायकवाड या 4 कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. दरम्यान या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ठाणे पोलिसांनी प्रथम अभिजित पवार याला २ वर्षाकरिता ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांमधून हद्दपार होण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता हेमंत वाणी हा दुसरा कार्यकर्ता देखील हद्दपार झाला आहे.

पालिका सहायक आयुक्तांवर हल्ला : ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर १५ फेब्रुवारी रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मारहाण करणारे अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशांत गायकवाड यांना ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याआधी जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहायक अभिजीत पवार यांनादेखील तडीपार करण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी आव्हाडांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता वाणी यांच्या तडीपारीमुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आला आहे.

दोन वर्षांसाठी हद्दपार केले : या कार्यकर्त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी ठाणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने चौघांना पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सदर प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून नौपाडा पोलिसांनी चारही आरोपींच्या तडीपारीच्या कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना देत वरिष्ठांनी त्यांना ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून दोन वर्ष हद्दपार केले आहे.

हेही वाचा -

  1. Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ मॉर्फ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी काँग्रेसने दिले पोलिसांना निवेदन
  2. Jitendra Awhad Reaction: तुम्हाला नेमणूक करण्याचा अधिकार कोणी दिला - जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
  3. Advertisement Controversy : तुमच्यातला नारदमुनी कोण ते ओळखा जाहिरातीवरून जितेंद्र आव्हाडांचा सेना-भाजपला टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.