ETV Bharat / state

Uran Neral railway : तब्बल २६ वर्षानंतर मुहूर्त! उरण-नेरळ रेल्वे मार्गाचे काम रुळावर

नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग (Uran Neral railway line) मागील 26 वर्षांपासून जमिनींचे संपादन, निधीची कमतरता आदी कारणांमुळे रखडला आहे. मात्र आता हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खारकोपर ते उरण ही सेवा 2023 मध्ये सुरू करण्याचा निर्णय सिडको आणि रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी रात्रंदिवस मजूर काम करीत आहेत. विशेष म्हणजे, यासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाकडून लक्ष घातले जात असल्याने हा प्रकल्प लवकरच पुर्णत्वास जाईल असा विश्वास सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (Uran Neral railway line is on track)

Uran Neral railway
उरण-नेरळ रेल्वे मार्गाचे काम रुळावर
author img

By

Published : Nov 8, 2022, 3:15 PM IST

मुंबई: रायगड जिल्ह्यातील खारकोपर ते उरण मार्गावरील गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा (नवघर), द्रोणागिरी (बोकडविरा) आणि उरणच्या रेल्वे स्थानकांच्या (Uran Neral railway line) कामाला वेग आला आहे. उरण रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंत तसेच स्थानकातील इतर सुविधाची ही कामे आता वेगाने सुरू करण्यात आली आहेत. (Uran Neral railway line is on track)

काय आहे या मार्गाची सद्यस्थिती?: या मार्गावरील प्लॅटफॉर्म तयार झाले असून स्थानकाच्या छताचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. छतासाठी लोखंडी बीम टाकण्याचे काम करण्यात येत आहे. यासाठी मोठ्या क्रेन्सच्या सह्यायने हे बीम बसविण्यात येत आहेत. हे स्थानकाच्या छताच्या कामासाठी रात्रंदिवस मजूर काम करीत आहेत. उरण मधील सिडकोच्या विकसित होत असलेल्या द्रोणागिरी नोड जवळ ही स्थानके असून या नागरी परिसरात मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या या रेल्वे मार्गाची प्रतीक्षा येथील नागरिकांना लागली आहे. खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने सुरू आहे. रेल्वेच्यावतीने या 14 किलोमीटर मार्गावर अखंड 260 मीटर लांबीचे रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम उरण स्थानकातून सुरू आहे.

काय आहे प्रकल्पाची पार्श्वभूमी ?: नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग रेल्वे मार्ग १९९७ मध्ये मंजूर झाला. मात्र, जमिनींचे संपादन, निधीची कमतरता आदी कारणांमुळे नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग गेल्या २६ वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे उरण आणि नजीकच्या परिसराच्या विकासालाही खीळ बसली. दरम्यान, आता शासनाला आणि सिडको उलवे नोड नंतर उरणच्या द्रोणागिरी नोडच्या विकासासाठी सुरुवात करायची आहे. त्यामुळेच या रेल्वे मार्गाच्या कामाला वेग आला आहे. यासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाकडून लक्ष घातले जात आहे. त्यामुळे जासई येथील रखडलेले रेल्वे पुलाचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले असून आता हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण केला जाईल, असा विश्वास सिडकोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

एल.बी. पाटील यांचा आंदोलनाचा इशारा: नेरूळ ते उरण रेल्वे या मार्गावरील नवघर येथील स्थानकाला न्हावा शेवा हे नाव देण्यात आले आहे. या नावाला येथील ग्रामस्थांचा विरोध आहे. हे नाव बदलून न्हावा शेवा ऐवजी नवघर नाव देण्याच्या मागणीसाठी येच्या १५ नोव्हेंबरला सिडकोच्या कार्यालया समोर नवघर येथील सामाजिक कार्यकर्ते एल.बी. पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे द्रोणागिरी स्थानक हे बोकडविरा गावा जवळ असल्याने द्रोणागिरी ऐवजी बोकडविरा स्थानक नाव देण्याची मागणी बोकडविरा ग्रामस्थांनी रेल्वे आणि सिडकोकडे केली आहे.यामुळे या प्रकल्पात अडथळा निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.