ठाणे - घोडबंदर किल्ल्याचा विकास करून शिवसृष्टीच्या धर्तीवर प्रकल्प उभारण्यात येणार असून उपवन तलाव आणि उपवन घाट यांचा विकास करण्याची सकारात्मकता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दर्शवली आहे. संस्कृती आर्ट फेस्टिव्हल सोहळ्याचा सांगता सोहळा संपन्न झाला. या फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती.
ठाण्यातील उपवन तलाव परिसरात संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलं होतं. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या या फेस्टिव्हलला अनेक मान्यवरांसह दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. हे फेस्टिव्हलचे यंदाचे सहावे वर्ष आहे.
संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हलने यावर्षी सध्याच्या जगण्याच्या दृष्टीने महत्वाचा असा ‘कलेचे हृदय’ हा विषय हाती घेतला होता. या महोत्सवाला हजारोच्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. या महोत्सवाला आदित्य ठाकरे यांनीही हजेरी लावली होती.
यावेळी बोलताना आदित्य यांनी घोडबंदर तसेच उपवन तलाव आणि घाट यांच्या विकासाबाबत सकारात्मकता दर्शवली. मुंबईत नाइट लाइफ ज्याप्रकारे सुरू केली तशी टप्याटप्याने ठाणे व इतर शहरात त्यांच्या मागणीनुसार विचार करू, असे मतही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.