ETV Bharat / state

Aditya Thackeray in Thane: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आदित्य ठाकरे गरजले.. म्हणाले, 'ही तर यांची विकृतीच..' - आदित्य ठाकरे ठाणे

उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके असे म्हणत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरून शिंदे फडवणीस सरकारवर टीका केली आहे. ठाण्यात बेरोजगार तरुणांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने नरेश मनेरा त्यांच्याकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

Aditya Thackeray Critics
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Jan 14, 2023, 9:01 PM IST

Updated : Jan 14, 2023, 9:53 PM IST

माजी मंत्री आदित्य ठाकरे माध्यमांसोबत बोलताना

ठाणे : महाराष्ट्रासह देशामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. ठाण्यात बेरोजगार तरुणांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने नरेश मनेरा त्यांच्याकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 50 कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभाग घेणार असून 5000 पेक्षा अधिक तरुणांना आणि युवतींना या रोजगार मेळाव्यात रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आदित्य ठाकरेंसह अरविंद सावंत व राजन विचारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकार वरती टीका करत सहा महिन्यात सर्वच उद्योगधंदे गुजरातला पळवले असल्याची आरोप केले आहेत.

सरकार पडणार असल्याचा दावा : बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच सर्व आमदार टेबलवर चढून नाचले ही यांची विकृती असल्याचे टीका आदित्य ठाकरे यांनी केली. गद्दारांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, मनात राम आणि हाताला काम हे आमचे मत आहे, असे देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हे सरकार नक्की पडणार आणि चाळीस आमदारांना या सरकारने विहारच दिला आहे असे देखील वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. तर अनेकजण दावोसला जाता जाता लटकले आणि झाकली मूठ सव्वा लाखाची अशाप्रकारे दाखवत आहेत, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती : ठाण्यात आयोजित या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. मात्र नव्याने नियुक्त केलेले ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांची अनुपस्थिती राहिली यामुळे हे दोन पदाधिकारी नाराज आहेत की काय असा सवाल आता ठाण्यामध्ये उपस्थित होत आहे. तर याच कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांना आमंत्रणच नसल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

कालही केली होती टीका: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत चारशे किलोमीटरचे रस्ते एका वर्षात पूर्ण केले जातील अशी घोषणा सार्वजनिक कार्यक्रमातून केली होती. मात्र, या संबंधित अधिवेशनात बोलताना अशा कामांना जवळपास तीन वर्षाचा कालावधी लागेल असे स्वतः त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री केवळ जनतेची दिशाभूल करत असल्याचं देखील आदित्य ठाकरे काल म्हणाले होते.

हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे फक्त एटीएम म्हणून पाहतात आदित्य ठाकरेंची टीका

Last Updated : Jan 14, 2023, 9:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.