ETV Bharat / state

Thane Crime : मालकाच्या पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या कामगाराला जन्मठेप

मालकाच्या पत्नीचे इतरांशीही प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून कामगाराने तिच्या राहत्या घरात गळा चिरून निर्घृण हत्या केली होती. ही घटना अंबरनाथ ( Ambernath ) पूर्वेकडील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ( Shivajinagar Police ) हद्दीत घडली होती. याच गुन्ह्यातील आरोपीला हत्येप्रकरणी दोषी ठरवत कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे ( Kalyan District Sessions Court ) न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

न्यायालय
न्यायालय
author img

By

Published : Jun 1, 2022, 4:37 PM IST

ठाणे - एका कंपनीत कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगाराचे त्याच कंपनीच्या मालकाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. मात्र तिचे इतरांशीही प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून त्या कामगाराने तिच्या राहत्या घरात गळा चिरून निर्घृण हत्या केली होती. ही घटना अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ( Shivajinagar Police ) हद्दीत घडली होती. याच गुन्ह्यातील आरोपीला हत्येप्रकरणी दोषी ठरवत कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे ( Kalyan District Sessions Court ) न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. मनोरंजन उर्फ राखाल सिध्देश्वर महाकुड, असे जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या आरोपी कामगाराचे नाव आहे.

मालकाच्या पत्नीची किचनमध्ये निर्घृण हत्या : जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला मनोरंजन उर्फ राखाल हा मूळचा ओरिसा राज्यातील रहिवाशी असून तो अंबरनाथ शहरातील एका कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होता. तर ज्या कंपीनीत काम करत होता. त्याच कंपनी मालकाच्या अंबरनाथ पूर्व भागात असलेल्या घरासमोरच आरोपी कामगार राहत होता. कंपनीच्या काही कामानिमित्त आरोपीचे मालकाच्या घरी येत जात होता. यामुळे कंपनी मालकाच्या पत्नीशी ओळख झाली. त्यानंतर ओळखीतून कंपनी मालकाच्या पत्नीशी त्याचे अनैतिक संबंध निर्माण झाले. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यातच २४ मे २०१६ रोजी होळीच्या दिवशी कंपनी मालकाने घरासमोर त्याची पत्नी, त्यांच्या दोन मुलींसोबत होळी खेळण्याची तयारी केली. मात्र कंपनी मालकाच्या पत्नीने तब्येत ठिक नसल्याचे पतीला सांगत आपण होळी खेळणार नाही, असे सांगितले. त्यामुळे कंपनी मालक आणि त्यांचे दोन मुली घराबाहेर होळी खेळत होत्या. घराबाहेर होळी खेळून झाल्यानंतर कंपनी मालक अंबरनाथमध्ये राहत असलेल्या आपल्या मेव्हण्याच्या घरी दोन्ही मुलींना घेऊन होळी खेळण्यासाठी गेले. मामाच्या घरी रंगोत्सव करून कंपनी मालक आपल्या दोन्ही मुलींसह घरी आला. त्यावेळी त्यांना धक्का बसला. घरामधील किचनमध्ये पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर या घटनेची माहिती कंपनी मालकाने नातेवाईकांना दिली असता नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी कंपनी मालकाने २४ मे २०१६ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पत्नीच्या हत्येप्रकरणी तक्रार दाखल केली.

आरोपीला रुग्णालयातून घेतले होते पोलिसांनी ताब्यात : पोलिसांनी तपास केला. त्यावेळी कंपनी मालकाच्या घरासमोर राहत असलेला कामगार मनोरंजन महाकुड घरात नसल्याचे आणि तो उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल असल्याची माहिती कंपनी मालक आणि शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन कामगार मनोरंजनची चौकशी केली. त्यावेळी त्याच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार होते. मनोरंजनने रुग्णालयात दाखल होताना आपल्या मित्राजवळ मी त्या बाईला मारले आणि त्या बाईने प्रतिकार करताना मला जखमी केले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने कंपनी मालकाच्या पत्नीची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिल्याने त्याच्यावर भादवी कलम ३०२, ४५२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली.

हत्येच्या दिवशी असा घडला घटनाक्रम : कंपनी मालकाची पत्नी आणि आपले प्रेमसंबंध होते. होळीच्या दिवशी कंपनी मालक, त्याच्या दोन्ही मुली मामाकडे होळी खेळण्यासाठी गेल्या. त्यावेळी मनोरंजन मालकाच्या घरी गेला. मालकाची पत्नी ही अन्य कोणा व्यक्तीचा तिच्या फोन आला. त्यामुळे इतरांशी प्रेमसंबंध असल्याचा संशय मनोरंजनला आला. त्याच रागात त्याने कंपनी मालकाच्या पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरला. महिलेने प्रतिकार करताना मनोरंजनवर पण वार केले, अशी माहिती सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी दिली. हा खटला सुनावणीला आल्यानंतर न्यायालयाने दहा दिवसात या प्रकरणात निर्णय दिला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. सचिन कुलकर्णी यांनी प्रभावी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू, साक्षी पुरावे तपासून पहिले असता मनोरंजनने खून केल्याचे साक्षी पुराव्यावरून सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे.

हेही वाचा - OLA Driver Murder : डोक्यात दगड घालून ओला चालकाची हत्या, चार आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.