पालघर : तुळींज येथील सोमवारी संध्याकाळी सीता सदन या इमारतीत मेघा शहा (४०) या महिलेचा तीन ते चार दिवसांपूर्वी हत्या करून बेडमध्ये ठेवलेला कुजलेला मृतदेह आढळला होता. तिचा पती फरार असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय होता. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी टीममधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. आरोपी पती दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने जीआरपीच्या मदतीने धावत्या ट्रेनमधून ताब्यात घेतले आहे. दोघांमध्ये पैश्यावरून नेहमी वाद होऊन भांडण होत असल्याने शेवटी पतीने पत्नीची हत्या केली आहे. 11 फेब्रुवारी रोजी खून घडली होती. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
गुन्ह्याची कबुली : महाराष्ट्रातील पालघरमध्ये श्रद्धा हत्याकांड सारखी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा वेदनादायक मृत्यू करून तिचा मृतदेह बेडमध्ये लपवून ठेवला. आता या प्रकरणी नवा खुलासा झाला आहे. २७ वर्षीय आरोपी हार्दिक शाह घरातील सर्व सामान विकून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यासाठी त्यांनी खरेदीदारांना घरी बोलावून मृतदेहातून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी अगरबत्ती पेटवली होती. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या मदतीने आरोपीला मध्य प्रदेशातील नागदा येथून अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी हरिद्वारला पळून जात होता. चौकशीत आरोपीनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी बेरोजगार असून दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पत्नी आणि बहिणीला हत्येची माहिती दिली होती आणि तो स्वतः आत्महत्येचा विचार करत होता.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लग्न झाले : हार्दिक आणि मेघा एका डेटिंग अॅपद्वारे एकमेकांना भेटले आणि काही काळ एकत्र राहिल्यानंतर दोघांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लग्न केले. नर्स म्हणून मेघा नोकरी करत होती, पण तिनेही नोकरी सोडली होती. पोलिसांनी सांगितले की, हार्दिकचे वडील हिरे व्यापारी असून ते दर महिन्याला हार्दिकला 20 हजार रुपये पाठवत असत, मात्र मेघाशी लग्न केल्यानंतर त्याने पैसे पाठवणे बंद केले. या जोडप्याने फेब्रुवारीच्या सुरुवातीला नालासोपारा येथील विजय नगर भागात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता.