नवी मुंबई - मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून 30 पेक्षा अधिक सुशिक्षित, नोकरदार तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या व त्यांचे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक शोषण करणाऱ्या तरूणाला नवी मुंबई रबाळे पोलिसांनी अटक केले आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या मुलींनी आता पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन विधानपरिषद उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे यांनी यांनी केले आहे.
तिला आपली फसवणूक झाल्याचे कळले तेव्हा या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार आरोपी सचिन याला नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणींनी पुढे येऊन आपली तक्रार दाखल करावी, असे आवाहन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. याप्रकरणात मुलींची नावे गुप्त ठेवण्यात येतील असेही त्या म्हणाल्या. तसेच फसवणूक झालेल्या मुलींचे मनोबल वाढावे म्हणून, याप्रकरणी महिला पोलीस अधिकारी नियुक्त करावी, अशी मागणी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांना केली आहे. याप्रकरणी सरकार मुलींच्या सोबत आहे, असेही त्या म्हणाल्या.