ETV Bharat / state

ठाण्यात पीएमसी बँकेच्या शाखां समोर खातेदारांच्या रांगा

पीएमसी बँकेच्या ठाण्यात वागळे इस्टेट, किसननगर, कळवा, घोडबंदर रोड, कोलशेत रोड अशा सहा शाखा आहेत. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बॅंकेवर कलम 35 अ अंतर्गत “प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन” घेतली आहे. 23 सप्टेंबरपासून हे निर्बंध लागू झाल्याची अधिसूचना आरबीआयने प्रसिद्ध केली आहे.

ठाण्यात पीएमसी बँकेच्या शाखां समोरखातेदारांच्या रांगा
author img

By

Published : Sep 24, 2019, 8:36 PM IST

Updated : Sep 24, 2019, 9:30 PM IST

ठाणे - आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बॅँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह सहकारी बॅंकेवर (पीएमसी बँक) सहा महिन्यांसाठीस निर्बंध लादले आहेत. आरबीआयने पीएमसी बँकेवर “प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन” घेतली असून यापुढे बँकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. त्याशिवाय खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ठाण्यात पीएमसी बँकेच्या शाखां समोरखातेदारांच्या रांगा

हे ही वाचा - पीएमसी बँकेवर 'आरबीआय'कडून निर्बंध, मुंबईत बँक शाखेबाहेर लोकांची गर्दी

या निर्णयामुळे ठाण्यात पीएमसी बँकेच्या शाखेबाहेर खातेदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
पीएमसी बँकेच्या ठाण्यात वागळे इस्टेट, किसननगर, कळवा, घोडबंदर रोड, कोलशेत रोड अशा सहा शाखा आहेत. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बॅंकेवर कलम 35 अ अंतर्गत “प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन” घेतली आहे. 23 सप्टेंबरपासून हे निर्बंध लागू झाल्याची अधिसूचना आरबीआयने प्रसिद्ध केली आहे. ज्यामुळे बँकेच्या खातेदारांना ‘आरबीआय’च्या निर्देशानुसार बँक खात्यातून मर्यादित रक्कम काढता येते. अनियमितता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील सहा महिन्यात त्यात यश येईल असे बँकेच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री अचानक बँकेकडून यासंदर्भात मोबाईलवर संदेश आल्याने खातेदारांची झोप उडाली. खातेदारांनी सकाळपासून ठाण्यातील पीएमसी बँकेच्या सर्वच शाखांसमोर गर्दी केली होती. किसननगर शाखेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि स्थानिक शिवसेना नगरसेवक योगेश जानकर आणि स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी भेट देवून माहिती घेतली. यावेळी शाखाधिकारी स्वाती सरफरे यांना ग्राहकांनी जाब विचारला.

हे ही वाचा - पीएमसी बँकेवर कारवाईचा बडगा, ६ महिन्यांसाठी आरबीआयने व्यवहार थांबवले

Intro:पीएमसी" बँकेवर आर्थिक निर्बंध ठाण्यातील बँकेच्या शाखेसमोरे खातेदारांच्या रांगाBody:

आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेवर सहा महिन्यांसाठीस निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेवर “प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन” घेतली असून यापुढे बॅंकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. त्याशिवाय खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान या निर्णयामुळे ठाण्यात PMC बँकांच्या शाखेच्याबाहेर खातेदारांना सकाळपासून गर्दी केली होती. तसेच यावेळी खातेदारांचे अश्रू अनावर झाले होते, यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
पीएमसी बँकेच्या ठाण्यात वागळे इस्टेट किसननगर,कळवा,घोडबंदर रोड,कोलशेत रोड आदी सहा शाखा आहेत. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पंजाब अँड महाराष्ट्र बॅंकेवर कलम 35 ए अंतर्गत “प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन” घेतली आहे. 23 सप्टेंबरपासून निर्बंध लागू झाल्याची अधिसूचना आरबीआयने प्रसिद्ध केली आहे. ज्यामुळे बँकेच्या खातेदारांना ‘आरबीआय’च्या निर्देशानुसार बँक खात्यातून मर्यादित रक्कम काढता येते. अनियमितता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील सहा महिन्यात त्यात यश येईल असे बँकेच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.दरम्यान,सोमवारी रात्री अचानक बैंकेकडून यासंदर्भात मोबाईलवर संदेश आल्याने खातेदारांची झोप उडाली.त्यामुळे त्यांनी सकाळपासून ठाण्यातील पीएमसी बैंकेच्या सर्वच शाखेसमोर गर्दी केली होती.किसननगर शाखेत खातेदारांचा गोंधळ शमवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि स्थानिक शिवसेना नगरसेवक योगेश जानकर आणि स्थायी समिती सभापती राम रेपाळे आदी हजर होते.यावेळी शाखाधिकारी स्वाती सरफरे यांना ग्राहकांच्या वतीने जाब विचारण्यात आलाConclusion:
Last Updated : Sep 24, 2019, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.