ठाणे - घरी जात असताना एक दुचाकी अचानक ओबडधोबड असलेल्या रस्त्यावर घसरली. याचवेळी मागून येणारी भरधाव ट्रक दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेली. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना भिवंडी शहरातील भिवंडी-वाडा रोडवरील सिराज हॉस्पिटल समोर घडली. जिशान मो.हनिफ अन्सारी (३८,रा, गैबीनगर, भिवंडी ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
![thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5597019_op.jpg)
भिवंडीतील गैबीनगर परिसरात राहणारा मृत जिशान हा शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घराच्या दिशेने जात होता. तो सिराज हॉस्पिटल समोर दुचाकीवर असताना हा रस्ता ओबडधोबड असल्याने दुचाकी घसरली आणि तो खाली पडला. मात्र, याचवेळी पाठीमागून भरधाव ट्रक येऊन त्याच्या अंगावरून गेली. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तर अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - 11 किलो गांजा बाळगणारे चौघे गजाआड