ETV Bharat / state

खारबांव रेल्वे स्थानकाजवळ आढळला धड-मुंडके वेगळा असलेला मृतदेह - Dombivali Railway Police

खारबांव स्टेशनजवळ(Kharbav Railway Station) धड व मुंडके वेगळा झालेला मृतदेह(Deathbody found) आढळून आला आहे. या मृतदेहाची ओळख पटली नाही. या प्रकरणाचा डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी(Dombivali Railway Police) तपास सुरू केला आहे.

mutilated body was found
धड मुंडके वेगळा असलेला मृतदेह
author img

By

Published : Nov 20, 2021, 8:11 PM IST

ठाणे - दिवा-वसई रेल्वे मार्गावरील खारबांव स्टेशनजवळ(Kharbav Railway Station) धड व मुंडके वेगळा झालेला मृतदेह(Deathbody found) आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख पटली नाही. सदर व्यक्तीचा अपघात, घातपात की त्याने आत्महत्या केली, याचा डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी(Dombivali Railway Police) तपास सुरू केला आहे.

  • मृतदेहाचे दूरवर पडलेले मुंडके आणले शोधून -

खारबांव रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला. जवळपास 45 वयोगटातील या व्यक्तीचा मुंडके नसलेला मृतदेह रूळापासून खालच्या बाजूस आढळून आला. हा प्रकार कळताच डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर या मृतदेहाचे दूरवर पडलेले मुंडके शोधून आणले. त्यानंतर हा मृतदेह शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे.

  • मृतदेहावरील कपडे आणि डीएनए तपासणीसाठी लॅबमध्ये -

या संदर्भात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे माहिती देताना म्हणाले, सदर मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे मृतदेहावरील कपडे आणि डीएनए ताब्यात घेण्यात आले असून फॉरेन्सिक लॅबकडे देण्यात येणार आहेत. तर स्पेशल ट्रेन क्रमांक 09262 पोरबंदर-कुचीवेली मेलच्या मोटरमनने दिलेल्या माहितीनुसार हा आत्महत्येचा प्रकार वाटतो, असेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढगे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.