ETV Bharat / state

'देव तारी त्याला कोण मारी' लोखंडी बाण गळ्यातून तोंडापर्यंत आरपार; मुलगा मृत्यूच्या जबड्यातून बचावला - ठाणे

इमारतीमधील लोखंडी गेटवर झोका खेळत असताना अचानक लोखंडी गेटमधील एक तीक्ष्ण बाण सार्थकरच्या गळ्यातून तोंडापर्यंत आरपार घुसला. हा बाण लोखंड कापणाऱ्या एका कटरने कापून वेगळा करण्यात आला व त्यानंतर जबड्यात रुतलेला बाण तसाच ठेवून सार्थकला डॉक्टर सुनील भोसले यांच्या उल्हासनगर कॅम्प नंबर 1 येथील व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

लोखंडी बाण गळ्यातून तोंडापर्यंत आरपार
author img

By

Published : Jul 3, 2019, 8:41 PM IST

ठाणे - एक सात वर्षीय मुलगा इमारतीमधील लोखंडी गेटवर झोका खेळत असताना त्या लोखंडी गेटमधील एक तीक्ष्ण लोखंडी बाण त्याच्या गळ्यातून तोंडापर्यंत आरपार घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सार्थक रमेश कळसुले असे या मुलाचे नाव असून एक तास मृत्यूशी लढा देत तो त्यातून वाचला आहे.

देव तारी त्याला कोण मारी

ही घटना उल्हासनगर जवळील म्हारळ गावात घडली असून अखेर तो लोखंडी बाण कटरच्या साह्याने कापून चिमुरड्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली आहे. यामुळे "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीप्रमाणे एक तास मृत्युशी झुंज देऊन तो चमत्कारिकरित्या बचावला आहे.

उल्हासनगरच्या म्हारळ गावातील एका इमारतीमध्ये सार्थक आपल्या आई-वडिलांसह राहतो. तो 28 जून रोजी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या मित्रासोबत खेळत होता. खेळण्याच्या ओघात सार्थक इमारतीच्या गेटवर झोके घेत असताना गेटच्या वरच्या भागात असणारा लोखंडी तीक्ष्ण एक बाण त्याच्या हनुवटीच्या खालून जबड्यात घुसून तोंडापर्यंत आरपार गेला. जबड्यात अडकलेला बाण सोडवण्याच्या प्रयत्नात रडणाऱ्या सार्थकची त्यातून सुटका करण्याच्या शेजाऱ्यांनी बराच प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. हा प्रयत्न जवळ-जवळ तासभर चालला. या प्रयत्नांना सार्थक मोठे हिम्मतीने साथ देत होता. अखेर तो बाण लोखंड कापणाऱ्या एका कटरने कापून वेगळा करण्यात आला. त्यानंतर जबड्यात रुतलेला बाण तसाच ठेवून सार्थकला डॉक्टर सुनील भोसले यांच्या उल्हासनगर कॅम्प नंबर 1 येथील व्यंकटेश रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून तो बाण वेगळा करण्यात आला. या सगळ्या जगण्याच्या संघर्षात सार्थकने दिलेली धीराची व साहसाची साथ आणि दैव बलवत्तर म्हणून त्याचे वाचले प्राण याबद्दल त्याचे पालक आणि शेजारी यांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला.

याबाबत डॉक्टर सुनील भोसले यांनी सांगितले की, सार्थकला रुग्णालयात दाखल केले तेव्हा तो घाबरलेला होता त्याला सारखा घाम आणि चक्कर येत होती. त्यामूळे आम्ही त्याला भूल देऊन शस्त्रक्रिया करून हा लोखंडी रॉड काढला. रॉड मुळे जो खड्डा गळ्यात झाला होता त्याला टाके लावले आहे. सध्या सार्थक व्यवस्थित असून त्याच्या तब्येतीत झपाट्याने सुधार होत आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:लोखंडी तीक्ष्ण बाण चिमुरडीच्या गळ्यातून तोंडापर्यंत आरपार ; चिमुरडा मृत्यूच्या जबड्यातून चमत्कारिक बचावला

ठाणे :- एक सात वर्षीय चिमुरडा इमारतीमधील लोखंडी घेतला झोका खेळत असताना त्या लोखंडी गेट मधील एक तीक्ष्ण लोखंडी बाण त्याच्या गळ्यातून तोंडापर्यंत आरपार घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे,
ही घटना उल्हासनगर नजीक म्हारळ गावात घडली असून अखेर तो लोखंडी बाण कटरच्या साह्याने कापून चिमुरड्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली आहे, यामुळ " देव तारी त्याला कोण मारी " या म्हणीप्रमाणे एक तास मृत्यूशी झुंज देऊन तो चमत्कारिक रित्या बचावला आहे, सार्थक रमेश कळसुले असे मृत्यूच्या जबड्यातून बचावलेल्या चिमुरडीचे नाव आहे,

उल्हासनगरच्या म्हारळ गावातील एका इमारतीमध्ये सार्थक आई-वडिलांचा राहतो तो 28 जून रोजी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या मित्रासोबत खेळत होता, खेळता-खेळता त्याचा मृत्यूची सामना होईल असे त्याला व त्याच्या कामावर गेलेल्या आई-वडिलांनाही स्वप्नातही वाटले नसावे, खेळण्याच्या ओघात सार्थक इमारतीच्या गेटवर झोके घेत असताना गेटच्या वरच्या भागात असणाऱ्या लोखंडी तीक्ष्ण बाण पैकी एक बाण त्याच्या हनुवटीच्या खालून जबड्यात घुसला व तो बाण तोंडापर्यंत आरपार गेला, जबड्यात अडकलेल्या बाण सोडण्याच्या प्रयत्नात रडणाऱ्या सार्थक ची त्यातून सुटका करण्याच्या शेजाऱ्यांनी बराच प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही हा प्रयत्न जवळ-जवळ तासभर चालला मात्र या प्रयत्नांना सार्थक मोठे हिम्मतीने साथ देत होता अखेर तो बान काढण्यासाठी लोखंड कापणाऱ्या एका कटरने कापून वेगळा करण्यात आला त्यानंतर ही तो जबड्यात रुतलेला बाण तसाच ठेवून सार्थक ला डॉक्टर सुनील भोसले यांच्या उल्हासनगर कॅम्प नंबर 1 येथील व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, या ठिकाणी यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून तो बाण वेगळा करण्यात आला , या सगळ्या जगण्याच्या संघर्षात कोड्या सार्थक ने दिलेली धीराची व सहसाची साथ आणि दैव बलवत्तर म्हणून त्याचे वाचले प्राण याबद्दल त्याचे पालक आणि शेजारी यांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला ,
याबाबत डॉक्टर सुनील भोसले यांनी सांगितले की, सार्थक ला रुग्णालयात दाखल केले तेव्हा तो घाबरलेला होता त्याला सारखा चक्कर आणि घाम येत होता म्हणून आम्ही त्याला भूल देऊन शस्त्रक्रिया करून हा लोखंडी रॉड काढला रोड मुळे जो खड्डा गळ्यात झाला होता त्याला टाके लावले सध्या सार्थक व्यवस्थित असून त्याची तब्येत झपाट्याने सुधारत आहे,
बाईट , व्हिज्युअल ftp
foldar -- tha, ulhasnagar jkhmi 3.7.19

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.