ETV Bharat / state

गुंड नरेश पहेलाजानी हत्या प्रकरण: ४ वर्षाने काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल - नरेश चड्डी हत्या प्रकरण

नरेश पहलाजानी उर्फ नरेश चड्डी हत्ये प्रकरणी उल्हासनगरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा प्रसिद्ध उद्योगपतीसह त्याचा मुलावर आणि एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नरेश चड्डी याच्या हत्येच्या ४ वर्षानंतर हा गुन्हा खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

thane, naresh chaddi murder thane
गोदू नारायणदास किशननी
author img

By

Published : Feb 29, 2020, 11:29 PM IST

ठाणे- कुप्रसिद्ध गुंड नरेश पहलाजानी उर्फ नरेश चड्डी हत्येप्रकरणी उल्हासनगरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा प्रसिद्ध उद्योगपतीसह त्याचा मुलावर आणि एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नरेश चड्डी याच्या हत्येच्या ४ वर्षानंतर हा गुन्हा खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरामुळे उल्हासनगरात एकच खळबळ उडाली आहे.

माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार

माजी नगरसेवक गोदुमल उर्फ गोदू नारायणदास किशननी, त्याचा मुलगा प्रवीण किशननी याच्यासह रवी असे हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. एकेकाळी मृत नरेश पहेलाजानी उर्फ चड्डी हा उल्हासनगरातील कुप्रसिद्ध गुंड म्हणून ओळखला जायचा. कालांतराने तो उल्हासनगर सोडून कल्याणातील खडकपाडा परिसरातील साई चौकातल्या साई पॅराडाईजमध्ये कुटुंबासह राहत होता. नरेश पहेलाजानी उर्फ चड्डडी याचा ३ फेब्रुवारी २०१६ रोजी राहत्या घरी मृत्यू झाला होता. त्यावेळी या घटनेची खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान मृत नरेश याची पत्नी दीपा, मुलगा प्रवीण व मोठा भाऊ राजू यांनी दिलेल्या फिर्यादित मृत नरेश पहेलाजानी हे उल्हासनगरात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात साक्षीदार होते. त्यामुळे, नरेश यांनी आरोपी गोदुमल उर्फ गोदू नारायणदास, त्यांचा मुलगा प्रवीण किशननी यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, मृत नरेश यांची देखरेख करणारा रवी याच्याशी मुख्य आरोपी गोदुमल याने संपर्क करून या तिघांनी आपसात संगनमत करून नरेश यांना जिवे ठार मारल्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच नरेश याच्या मृत्यूपश्चात करण्यात आलेल्या १९ डिसेंबर २०१९ रोजीच्या अंतिम शवविच्छेदन अहवालात नरेश याच्या शरीरावर खरचटलेल्या रक्त साकळलेल्या जखमा होत्या. तसेच श्वासोच्छवास गुदमरून मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी आरोपी गोदुमल उर्फ गोदू नारायणदास त्यांचा मुलगा प्रवीण किशननीसह रवी नावाच्या व्यक्तीविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा- कॉर्पस फंडच्या नावाने बांधकाम विकासकांनी घातला साडेपाच कोटींचा गंडा; गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.