ETV Bharat / state

शासनाची परवानगी न घेताच २९ हजारांच्यावर कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरसह महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल

कोरोनाचा आजार २४ तासातच शंभर टक्के बरे करणारा एक व्हिडिओ मागील आठ दिवसांपासून सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे आरोग्य जगतात खळबळ उडाली. त्यांनतर व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणण्यासाठी प्रयत्न केला.

रुग्णालय
रुग्णालय
author img

By

Published : May 8, 2021, 7:28 PM IST

ठाणे - कोरोनाचा आजार २४ तासातच शंभर टक्के बरे करणारा एक व्हिडिओ मागील आठ दिवसांपासून सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे आरोग्य जगतात खळबळ उडाली. त्यांनतर व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणण्यासाठी प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात असलेल्या एका क्लिनिकमध्ये कोरोना रुग्णांवर खरच उपचार सुरू असल्याचे पाहावयास मिळाले. त्या व्हायरल व्हिडिओमधील तो रुग्णही येथे उपस्थित होता. त्यावेळी त्याला विचारले असता माझे ९० टक्के लग्न्स (फुप्फुस) बाधित झाले होते. मात्र, येथे उपचारानंतर कोरोनातून बरा झाल्याचे त्याने सांगितले. तर शीला क्लिनिक चालविणारे डॉ. यु. एस. गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता आतापर्यत २९ हजारांच्यावर कोरोना रुग्णांना होमियोपॅथिक औषधाने बरे केल्याचा त्यांनी दावा केला. मात्र, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लागणारी आरोग्य विभागाची परवनगी न घेताच उपचार केल्याने डॉक्टरसह एका महिला डॉक्टरावर कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे देशभरात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शासकीय व खासगी कोविड रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणासह इंजेक्शन व औषधे देऊन रुग्ण बरे केले जातात. अश्यातच गुन्हा दाखल झालेल्या डॉ. यु. एस. गुप्ता यांनी दावा केला की, माझ्या होमियोपॅथिक औषधाच्या ड्रॉपचे दोन थेंब नाकात टाकल्यावर कोरोना रुग्ण बरा होतो. मात्र, हा दावा 'किती खरा, किती खोटा' हे तर पोलिसांच्या तपासाअंती सत्य समोर येईल.

प्रतिक्रिया

चाळीत पत्र्याच्या खोलीत कोरोना रुग्णांवर उपचार

एकीकडे कोट्यवधी निधी खर्चून शासनाच्या वतीने ठिकठिकाणी हजारो खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय उभारली गेली आहे. तसेच या रुग्णालयात कोविड रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणासह इंजेक्शन व औषधे देऊन रुग्ण बरे केले जात आहे. मात्र, ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी न घेताच डॉ. गुप्ता यांनी एका महिला डॉक्टरसह वांगणी पश्चिम परिसरात असलेल्या अन्सारी चाळ लगतच १० बाय २० च्या पत्र्याच्या खोलीत दाटीवाटीने कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे दिसून आले. शिवाय या पत्र्याच्या खोलीतील या क्लिनिकमध्ये ना व्हेंटिलेटर, ना ऑक्सिजन, ना सॅनिटायझर, ना रुग्णांच्या ना डॉक्टरच्या तोडाला मास्क तरीही प्रकृती चिंताजनक असलेले रुग्ण कोरोनामुक्त कसे होतात हा संशोधनाचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे डॉ. गुप्ता कोरोनाग्रस्त रुग्णांची तपासणी केल्यानंतर केवळ बोरिक पावडरने हात धुतात, तसेच रुग्णांच्या हातावरही बोरिक पावडर टाकून हात धुण्यास सांगतात. त्यामुळे शासनाचे कोरोना नियम बाजूला सारून खरच असे उपचार कितपत योग्य आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

आतापर्यंत २९ हजारांच्यावर कोरोना रुग्ण बरे केल्याचा दावा

डॉ. गुप्ता यांच्या शीला क्लिनिकमध्ये चिंचोळ्या जागेतच रुग्णांसाठी कडप्पा लादीचे ३ ते ४ बेड आहेत. याच बेडवर आतापर्यत २९ हजारांच्यावर कोरोना रुग्ण बरे केल्याचा दावा डॉ. गुप्ता यांनी केला आहे. विशेष म्हणजे व्हायरल व्हिडिओ पाहून रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना घेऊन डॉ. गुप्ता यांच्याकडे उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. यामध्ये परराज्यातील रुग्णांसह मुबंई, ठाणे, कल्याण, बदलापूर, नाशिक, मुरबाड, पनवेल अशा विविध शहरातून रुग्णांची रांग पहाटेपासूनच लागत असल्याचे सांगण्यात आले.

उपचारासाठी दक्षिण आफ्रिकेतून औषध आणल्याचे सांगून फसवणूक

अंबरनाथ तालुक्यात वांगणी जवळील भोई सावरे या ग्रामीण भागात राहणारे जनार्दन भोईर हे किडनीच्या विकाराने त्रस्त आहेत. याच दरम्यान २६ फेब्रुवारी, २०२१ रोजी त्याने वांगणीमधील शिला क्लिनिक मधील यु. एस. गुप्ता यांच्याकडे उपचार केले. मात्र, तुझ्यावर उपचारासाठी दक्षिण आफ्रिकेत औषध मागवतो, असे सांगून स्पिरिट, सॅनिटायझर सदृश्य द्रव आणि पिठी साखर दिली. ते घेतल्याने त्रास झाल्याचा आरोप जनार्दन भोईर याने केला होता. या प्रकरणी भोईर यांनी ठाणे पोलीस अधीक्षक आणि बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. मात्र, आपल्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण डॉक्टर गुप्ता यांनी दिले. मात्र, या तक्रार अर्जाचे पोलिसांनी काय केले. याची माहिती अद्यापही गुलदस्त्यातच असल्याचे तक्रार अर्ज देणाऱ्याकडून सांगण्यात आले.

जिल्हा आरोग्य प्रशासनाने दखल घेत, केला गुन्हा दाखल

कल्याण-डोंबिवली इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए वतीने डॉ. गुप्तांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत चिंता व्यक्त केली आहे. जर कोरोना जादूने बरा होत असेल तर हे अंधश्रद्धा असू शकते. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी व रुग्णांची डॉ. गुप्ताचे असे अश्या उपचाराला बळी न पडता शासकीय व शासन मान्य कोविड रुग्णालयात उपचार करावे. जेणे करून तुमचा जीव वाचू शकतो, असे आव्हान कल्याण डोंबिवली आयएमएचे पदाधिकारी डॉ. राजेंद्र केसरवानी यांनी केले. तसेच डॉ. गुप्ताचा यांचा व्हायरल व्हिडिओ जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे आयएमए या डॉक्टर संघटनेने पाठवून डॉ. गुप्ता विरोधात तक्रार केली. तसेच व्हायरल व्हिडिओची जिल्हा आरोग्य विभागानेही दखल घेतली असून डॉ. गुप्तासह एका महिला डॉक्टरवर भा.द.वी.चे कलम २६९, १८८ सह महाराष्ट्र कोविड उपाय योजना कलम ११ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ (ब), प्रमाणे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बनसोडे यांच्या तक्रारीवरून कुळगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे करीत आहेत.

हेही वाचा - खासगी क्लासच्या शिक्षकाकडून कोरोनाबाधितांसाठी मोफत रुग्णवाहिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.