ठाणे - भिवंडी शहरात वाढत्या वाहन चोरीच्या व घरफोडीच्या घटनांनी नागरीक त्रस्त झाले आहेत. भिवंडी पोलिसांनी या चोरट्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शहरातून होत आहे. अशातच भिवंडी पोलिसांनी चोरी व घरफोडीच्या तब्बल अकरा गुन्ह्यांची उकल केली असून आठ जणांना अटक केले असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली.
पोलिसांच्या जाळ्यात असे अडकले आरोपी - शांतीनगर पोलिसांनी विविध गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार चव्हाण कॉलनी येथून बिलाल अहमद सलीम अन्सारी यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने शांतीनगर व कोनगाव येथून चोरी केलेल्या प्रत्येकी दोन अशा चार दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून १ लाख ३० हजार किमतीच्या ४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर घरफोडीच्या गुन्ह्यात अशफाक अली अन्सारी व परवेज मोहम्मद शहा या दोघा जणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून ५४ हजार २५० रुपयांची घड्याळे जप्त केली. दुसऱ्या घरफोडीच्या दुसऱ्या गुन्ह्यात खालिद अब्दुल खान ,फैयाज शेख ,पिंटूकुमार केशरवाणी अशा तिघांच्या मुसक्या आवळून कापडाचे तागे ,धाग्याचे कोम चोरीतील तब्बल ६ लाख ४८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्यात शहानवाज हुसेन ,आरिफ नूर शेख (रा.धुळे) याच्या ताब्यातून ४ लाख ५५ हजार रुपये किमतीचे ३ बोलेरो टेम्पो जप्त करण्यात यश मिळविले आहे.
१२ लाख ८८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत - शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखालील विविध पोलीस पथकांनी गुप्त बतमीदारांच्या माध्यमातून माग काढत एकूण ८ आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांच्या ११ गुन्ह्याची उकल करीत तब्बल १२ लाख ८८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. या मध्ये ३ बोलेरो टेम्पो, ४ दुचाकी, कपड्याचे तागे, मनगटी घड्याळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.
वाहन चोरीसह घरफोडीच्या ११ गुन्ह्याची उकल, ८ आरोपींना अटक
शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखालील विविध पोलीस पथकांनी गुप्त बतमीदारांच्या माध्यमातून माग काढत एकूण ८ आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांच्या ११ गुन्ह्याची उकल करीत तब्बल १२ लाख ८८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. या मध्ये ३ बोलेरो टेम्पो, ४ दुचाकी, कपड्याचे तागे, मनगटी घड्याळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.