ETV Bharat / state

ठाण्यात शेकडो मृत्यूनंतरही प्रशासन ढिम्मच; हजारो नागरिकांचे धोकादायक इमारतीत वास्तव्य

author img

By

Published : Aug 31, 2020, 1:31 PM IST

महाड इमारत दुर्घटनेनंतर ठाणे शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये गुंतलेल्या प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या असल्याचा दावा केला आहे. तर ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी, आम्ही धोकादायक इमारतींवर लक्ष ठेऊन असल्याचं म्हटलं आहे. ठाणे शहरात ७९ अतिधोकादायक इमारती असून यातील ३५ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. सद्यघडीला ४४ इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव आहे.

79 dangerous building in thane
ठाण्यात शेकडो मृत्यूनंतरही प्रशासन ढिम्मच; हजारो नागरिकांचे धोकादायक इमारतीत वास्तव्य

ठाणे - महाडच्या दुर्घटनेनंतर एमएमआर रिजनमधील महापालिकांच्या हद्दीत असलेल्या अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींच्या संदर्भात महापालिकांनी पावसाळ्यापूर्वी योग्य खबरदारी घेतली आहे का नाही? असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे. मागील चार महिने संपूर्ण यंत्रणा ही कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये गुंतल्याने या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिकेने मात्र शहरातील सर्व अतिधोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्या आहेत, असा दावा केला आहे. तर कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये यंत्रणा गुंतली असली तरी धोकादायक इमारतींककडे प्रशासन लक्ष ठेऊन असल्याचे, पालिकेत आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील ७९ अतिधोकादायक इमारतींपैकी पालिका प्रशासनाने एक महिन्यापूर्वी केवळ ३५ अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ४४ इमारतींमध्ये अजूनही रहिवाशांचे वास्तव्य आहे. यात सर्वाधिक धोका हा नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात असलेल्या इमारतींना असून ३७ पैकी केवळ १३ इमारतीच रिकाम्या करण्यात आल्या होत्या. सर्व यंत्रणाच लक्ष कोरोनाकडे असल्याने अतिधोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात महाड सारखी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन बघत आहे का? असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे.

नागरिकांसह आयुक्तांची प्रतिक्रिया..

ठाण्यात देखील अजूनही ४४ अतिधोकादायक इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव्य असून या इमारती रिकाम्या करून त्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ही आकडेवारी एक महिन्यापूर्वीची असल्याने अधिक खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिकेकडून घोषित करण्यात येत असलेल्या धोकादायक इमारतींपैकी सी-1 अर्थात अतिधोकादायक इमारतीचा प्रकार असून अशी इमारत नोटीस बजावल्यानंतर काही कालावधीनंतर जमिनदोस्त केली जाते. तर सी-1- ए मधील म्हणजे धोकादायक इमारती रिकाम्या करून त्याची संरचनात्मक परिक्षण केले जाते.

यंदा केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये ठाणे पालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समितीमधील सुमारे 4 हजार 300 धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये अतिधोकादायक 79 इमारतींचा समावेश आहे. त्यापैकी 35 इमारती रिक्त करण्यात आल्या असून आता 44 इमारती या प्रकारांमध्ये शिल्लक आहेत. त्याही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्याचबरोबर सी- 2 ए मध्ये 113 इमारतींचा समावेश आहे. यातही सुमारे 150 पेक्षा अधिक कुटूंब ही धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. या इमारतींमधील रहिवाशांना खबरदारीची उपाययोजना म्हणून घरे रिकामी करण्याच्या नोटीसा आधीच पालिकेने बजावलेल्या आहेत. मात्र, कोरोना आणि पावसाळयाच्या दुहेरी संकटामुळे अनेक इमारतींमधील रहिवाशांनी त्या रिक्त करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

कधी होणार क्लस्टर विधानसभा निवडणुकीपूर्वी केले होते उद्घाटन -
मागील आघाडी सरकारच्या काळात क्लस्टर योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली. मात्र हे क्लस्टर आजही प्रतीक्षेत आहे. जवळपास एक दशक झाल्यावर ही क्लस्टर सुरू होत नाही. त्यात अनेक अडचणी आजही आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी क्लस्टरचा उपयोग करतात. मात्र आजही क्लस्टरच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक जीव मुठीत घेऊन त्याच धोकादायक घरात राहत आहेत. तत्कालीन महानगर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा नारळ 2019 विधानसभा निवडणुकीच्या आधी फोडून उदघाटन केले होते. आता याला देखील वर्ष पूर्ण व्हायला आले. पण प्रत्यक्षात याची सुरूवात झालेली नाही.

प्रभाग समिती निहाय अतिधोकादायक इमारतींची संख्या -

  • नौपाडा-कोपरी - ३७
  • मुंब्रा - १४
  • वर्तकनगर - ९
  • उथळसर - ७
  • लोकमान्य-सावरकर नगर - ५
  • कळवा - ३
  • दिवा - १
  • वागळे - १

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.