ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाचे 23 रुग्ण आढळले आहेत. तर आज 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवलीतील सोमवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एक महिन्याच्या बालिकेसह 2 लॉड्री चालकांचा समावेश असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
सोमवारी आढळून आलेल्या 23 रुग्णांमध्ये 19 रुग्ण मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि त्यांच्या निकट सहवासातील रुग्ण आहेत. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 344 वर पोहचली आहे. यामध्ये मुंबई आणि अन्य ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील 137 रुग्णांचा समावेश आहे. तर त्यांच्या निकट सहवासातील 59 रुग्ण आहेत.
सध्याच्या घडीला विविध रुग्णालयात 235 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर 104 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत कल्याण डोंबिवलीतील 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.