ETV Bharat / state

चिमुरडीवर बलात्कार करून खून; आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी - ठाणे बलात्कार प्रकरण

भरतकुमार धनीराम कोरी (वय- 30) या आरोपीने भिवंडी तालुक्यातील एका गावात सात वर्षीय चिमुरडी घराबाहेर खेळत असताना शनिवारी रात्रीच्या सुमाराला अपहरण करून तीच्यावर अत्याचार केला. त्यानंतर झुडपात नेवून तिची दगडाने ठेचून हत्या करुन फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

30-year-old man held for rape of minor girl
चिमुरडीवर बलात्कार करून खून; आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी
author img

By

Published : Dec 24, 2019, 8:56 AM IST

ठाणे - भिवंडीमध्ये सात वर्षीय शाळकरी मुलीवर अमानूष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अवघ्या दहा तासात अटक केली. पोलिसांनी आरोपीला सोमवारी दुपारी जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 जानेवारीपर्यंत 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. भरतकुमार धनीराम कोरी (वय- 30) असे आरोपीचे नाव आहे, तर पीडितेच्या आईने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - प्लास्टिकच्या गोणीत मृतदेह सापडलेल्या 'त्या' मुलाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक

नराधम भरतकुमार याने भिवंडी तालुक्यातील एका गावात सात वर्षीय मुलगी घराबाहेर खेळत असताना शनिवारी रात्रीच्या सुमाराला अपहरण करून तीच्यावर अत्याचार केला. त्यानंतर झुडपात नेवून तिची दगडाने ठेचून हत्या केली व फरार झाला. रविवारी सकाळी 6 च्या सुमारास तेथील झुडपात शौचास गेलेल्या एका व्यक्तीस तीचा मृतदेह आढळून आल्याने त्याने आरडाओरड करीत ही घटना पीडितेच्या कुटुंबीयांना सांगितली.

भोईवाडा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून तातडीने अटक केली व न्यायालयात हजर केले.

हेही वाचा - चिखलीत खेळताना दोरीचा फास लागल्याने चिमुकलीचा मृत्यू

Intro:kit 319Body:चिमुरडीवर बलात्कार करून खून प्रकरणी आरोपीला १२ दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे : भिवंडी तालुक्यातील कारीवली ,सुभाषनगर येथे राहणाऱ्या एका सात वर्षीय शाळकरी मुलीवर अमानूष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अवघ्या दहा तासात अटक करून सोमवारी दुपारी जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ जानेवारीपर्यंत १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भरतकुमार धनीराम कोरी ( ३० रा.कारीवली ) बलात्कारी ,खूनी नराधमाचे नाव आहे. तर पीडितेच्या आईने आरोपीला 'मौत कि सजा हो' असा आक्रोश करीत पोलिसांकडे मागणी केली आहे.
नराधम भरतकुमार याने भिवंडी शहरालगतच्या कारीवली ग्रामपंचायत हद्दीतील सुभाषनगर या परिसरात राहणाऱ्या एका सात वर्षीय मुलीचे घराबाहेर खेळत असताना शनिवारी रात्रीच्या सुमाराला अपहरण करून तिच्यावर पाशवी शारिरीक अत्याचार केला . त्यानंतर झुडपात नेवून तिची दगडाने ठेचून हत्या करून घटनस्थळावरून फरार झाला होता. रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तेथील झुडपात शौचास गेलेल्या एका व्यक्तीस तिचा मृतदेह आढळून आल्याने त्याने आरडाओरड करीत ही खबर कुटुंबियांना दिली.
त्यानंतर भोईवाडा पोलिसां कळवण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भोईवाडा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून त्यास भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी परिसरातून सापळा लावून नराधमाला ताब्यात घेऊन अटक केली. सोमवारी दुपारी त्यास जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे करीत आहे. दरम्यान, पीडितेच्या आईने आरोपीला मौत कि सजा हो असा आक्रोश करीत मागणी केली आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.