ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील ३० टक्के नालेसफाई पूर्ण, उर्वरीत 15 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश

कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ९८.११ कि. मी. लांबीचे ९३ मोठे नाले असून, या मुख्‍य नाल्‍यांची साफसफाईची कामे सुरू केली आहेत. पोकलेन, जेसीबी व कामगारांच्‍या मदतीने ही कामे सुरू करण्यात आली असून, आजतागायत ३० टक्‍के नाले सफाईची कामे पूर्ण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

Kalyan Dombivali municipal
कल्याण डोंबिवली क्षेत्रातील ३० टक्के नालेसफाई पूर्ण
author img

By

Published : May 20, 2020, 8:02 PM IST

ठाणे - कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ९८.११ कि. मी. लांबीचे ९३ मोठे नाले असून, या मुख्‍य नाल्‍यांची साफसफाईची कामे सुरू केली आहेत. पोकलेन, जेसीबी व कामगारांच्‍या मदतीने ही कामे सुरु करण्यात आली असून, आजतागायत ३० टक्‍के नाले सफाईची कामे पूर्ण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. तर पुढील १५ दिवसात नाले सफाईची कामे पूर्ण करण्याबाबतचे निर्देश पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचेही सांगण्यात आले.

पावसाळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नाले सफाईची कामे सुरू असून, महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी व शहर अभियंता सपना कोळी यांनी आज महापालिका क्षेत्रातील नाले सफाईच्‍या कामांची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कल्‍याण (प.) येथील शहाड अंबिकानगर नाला, मिलींद नगर, घोलप नगर नाला, जरीमरी नाला, कल्‍याण (पूर्व) लोकधारा नाला, खडेगोळवली नाला तसेच डोंबिवली विभागातील गांधीनगर नाला इत्यादी नाल्‍यांची आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी केली. नाले सफाईच्‍या कामात गती वाढवून सफाईची कामे तातडीने पूर्ण करणे, नाल्‍यातून काढलेला गाळ उचलणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्‍या आहेत.

पालिका आयुक्‍त डॉ.विजय सूर्यवंशी व शहर अभियंता सपना कोळी (देवनपल्‍ली) यांनी कोपर ब्रिज कामाची व वडवली ब्रिजच्‍या कामाची देखील पाहणी केली. कोपर ब्रिजच्‍या पुढे रेल्‍वे ट्रॅक पर्यंत तोडण्‍याचे काम वेळेत पूर्ण करणेबाबत निर्देश त्‍यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. वडवली उड्डाण पुलाचे काम सन २०१० पासून प्रलंबित आहे. त्‍यामुळे लॉकडाऊनच्‍या काळात सुद्धा सदर पुलाचे काम सुरु करण्‍यास पालिका आयुक्‍तांनी विशेष परवानगी दिली. पुलाच्‍या शेवटच्‍या स्‍लॅबचे कॉंक्रीटीकरण करण्‍यात आले आहे. भरीव पोहच रस्‍ते, सुरक्षात्‍मक कठडा व पुलावरील डांबरीकरण इत्‍यादी कामे पुढील चार महिन्‍यात पूर्ण करण्‍याचे नियोजन आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.