ETV Bharat / state

कल्याण डोंबिवलीत २४ तासात ३० कोरोनाचे नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ७२७ वर - बाधितांचा आकडा ७२७ वर

कल्याण डोंबिवलीत २४ तासात ३० कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आजच्या रुग्णांच्या संख्येची नोंद पाहता कोरोनाबाधितांचा आकडा ७२७ वर जाऊन पोहोचला आहे. तर आतापर्यत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे २६८ रुग्णांना आतापर्यत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

corona in Kalyan Dombivali
कल्याण डोंबिवली
author img

By

Published : May 23, 2020, 8:37 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवलीत २४ तासात ३० कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर आजच्या रुग्णांच्या संख्येची नोंद पाहता कोरोनाबाधितांचा आकडा ७२७ वर जाऊन पोहचला आहे. तर आतापर्यत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे २६८ रुग्णांना आतापर्यत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्याच्या स्थितीत ४४१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एका ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा समावेश असून तो ठाकुर्ली पूर्वेत राहणारा आहे. तर आजही रुग्णामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण डोंबिवली पश्चिम परिसरातील असून त्याखालोखाल कल्याण पूर्व भागात राहणारे आहेत. तर कल्याण पश्चिम परिसरात सर्वात कमी संख्या रुग्णांची आहे. मात्र डोंबिवली पूर्व परिसरातही बाधित रुग्णांच्या संपर्क येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. दरम्यान, आज आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी डोंबीवली पश्चिममध्ये १२ रुग्ण, डोंबिवली पूर्वेत ४ रुग्ण, कल्याण पूर्वेत १० रुग्ण, कल्याण पश्चिम परिसरात २ तर ठाकुर्ली आणि टिटवाळा परिसरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.