ETV Bharat / state

भिवंडीत अनैतिक संबंधातून १० दिवसांत ३ महिलांची हत्या; तर एकीची आत्महत्या

यंत्रमाग नगरी, कामगारांचे शहर म्हणून भिवंडी शहराची ओळख आहे. मात्र, या शहरात वाढत्या गुन्हेगारीचा आलेख पाहता, लॉकडाऊन नंतर दुप्पटीने विविध गुन्ह्यांत वाढ झाल्याचे शहरातील पोलीस ठाण्यांच्या नोंदीवरून दिसून येते. गेल्या १० दिवसांत अनैतिक संबधातून ३ महिलांची हत्या झाली असून एकीने आत्महत्या केली आहे. यापैकी दोन प्रेयसी एक पत्नी तसेच आईचा समावेश मृत महिलांमध्ये आहे.

3 women killed in 10 days due to immoral relationship in Bhiwandi one suicided
भिवंडीत अनैतिक संबंधातून १० दिवसांत ३ महिलांची हत्या; तर एकीची आत्महत्या
author img

By

Published : Sep 26, 2022, 10:30 PM IST

भिवंडी (ठाणे) यंत्रमाग नगरी, कामगारांचे शहर म्हणून भिवंडी शहराची ओळख आहे. मात्र, या शहरात वाढत्या गुन्हेगारीचा आलेख पाहता, लॉकडाऊन नंतर दुप्पटीने विविध गुन्ह्यांत वाढ झाल्याचे शहरातील पोलीस ठाण्यांच्या नोंदीवरून दिसून येते. गेल्या १० दिवसांत अनैतिक संबधातून ३ महिलांची हत्या झाली असून एकीने आत्महत्या केली आहे. यापैकी दोन प्रेयसी एक पत्नी तसेच आईचा समावेश मृत महिलांमध्ये आहे.

अनैतिक संबंध उघड करण्याच्या भीतीमुळे हत्या पहिल्या घटनेतील मृत महिला पतीला सोडून उल्हासनगरमधील तिच्या ओळखीचा संतोष चौरसिया याच्या सोबत राहत असताना तिला कामाची गरज होती. त्यामुळे संतोषने तिला भिवंडीतील सोनाळे गावात राहणाऱ्या आरोपी राजकुमार पासवान याच्याकडे आणून सोडले. विशेष म्हणजे आरोपी राजकुमार हा पत्नी सोबत राहत असताना चार महिन्यांपूर्वी पत्नी मूळ गाव असलेल्या बिहारला निघून गेली. त्यानंतर मृत व आरोपीमध्ये सूत जुळून अनैतिक संबंध निर्माण झाले. त्यातच गेल्या चार महिन्यापासून दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये एकत्र राहत होते.

मात्र, त्यांच्यात काही कारणांवरून वाद झाल्यानंतर दोघातील अनैतिक संबंध पत्नीला व पोलिसांना माहिती देईन, अशी भीती ममतादेवी राजकुमारला दाखवत होती. याच कारणावरून १३ सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा त्यांच्यात वाद होऊन आरोपी राजकुमारने ममतादेवीचे डोके जमिनीवर आदळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याच दिवशी तो दाराला कुलूप लाऊन फरार झाला होता.

अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या आईची हत्या दुसऱ्या घटनेतील मृत आई ही भिवंडीतील काल्हेर गावातील एका इमारतीमध्ये कुटूंबासह राहत होती. तर आरोपी मुलगा कृष्णा हा अविवाहित असून त्याचे घटस्फोट झालेली चुलत बहिण बबिता सोबत मागील ३ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याची कुणकुण मृत आईला लागल्याने तिने कृष्णाच्या या अनैतिक संबंधास विरोध करीत होती. त्यामुळे पोटच्या मुलानेच आईच्या हत्येचा कट रचला.

प्रेयसीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा आरोपीचा प्लॅन तिसऱ्या घटनेतील आरोपी सद्दाम आणि मृत कविता या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याने दोघेही गेल्या ५ ते ६ वर्षांपासून भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. तर मृतक रेडलाईट एरियात देहविक्रीचा व्यवसाय करत होती. त्यातच २२ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता भांडण होऊन वाद विकोपाला गेल्याने सद्दाम याने राहत्या घराच्या बेडरूममध्ये कविताचा गळा आवळून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा लपवण्यासाठी त्याने कविताच्या नातेवाईकांनाही फ़ोनद्वारे सदर घटनेची माहिती कळवली व रुग्णवाहिकेतून मृतदेह विजापूर (कर्नाटक) नेऊन विल्हेवाट लावल्याचा प्लॅन रचला होता. पण तो फएल गेला. सद्दाम याच्यावर भादवि कलम ३०२, २०१ अन्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

पतीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातुन पत्नीची आत्महत्या चौथ्या घटनेतील पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आहे. रेणूका सुनिलकुमार थालोर (२४) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. शहरातील कोंबडपाडा परिसरातील ब्राम्हण आळी येथील सोमेश्वर अपार्टमेंटमध्ये रेणुका तिच्या पतीसोबत राहत होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.