ETV Bharat / state

कल्याणमधील २७ गावे मुलभूत सुविधापासून वंचित; गावकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय - thane

या गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. या निर्णयानंतर अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ आपल्या बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम आहेत.

निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा गावकऱ्यांनी दिलेला इशारा
author img

By

Published : Mar 29, 2019, 3:45 AM IST

ठाणे - कल्याण लोकसभा मतदारसंघात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गावकऱ्यांमध्ये असणारी घुसमट बाहेर येऊ लागली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावात मुलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापू लागले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांमध्ये विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. परिणामी या गावांमधील नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध असंतोष पसरला आहे. गेल्या ४ वर्षांपासून या २७ गावाची स्वतंत्र महानगरपालिका करण्याची मागणी सुरू आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र महानगरपालिकेचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यातही महापालिका प्रशासनाकडून या गावांना मुलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नसून गावात परिस्थिती भीषण बनली आहे. एकीकडे विकासकामे झाली नाहीत तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा गावकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे.

या गावातील ग्रामस्थांनी मिळून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. या निर्णयानंतर अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ आपल्या बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम असून पुढील निर्णय गावातील तरुण घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:27 गावात मूलभूत सुविधापासुन वंचित; गावकरी टाकणार लोकसभा निवडणुकीत बहिष्कार

ठाणे :- कल्याण लोकसभा मतदारसंघ सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गाडीमध्ये गावकऱ्यांचे घुसमट बाहेर येऊ लागली आहे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या 27 गावातील मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे सांगत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापू लागले आहे

कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या सत्तावीस गावांमध्ये विकासकामांचा बोजवारा उडाला असल्याने या गावातील सत्ताधाऱ्याविरुद्ध असंतोष पसरला आहे गेल्या चार वर्षापासून या 27 गावाची स्वतंत्र महानगरपालिका करण्याची मागणी सुरू आहे या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र महानगरपालिकेचं आश्वासन दिले होते मात्र अद्यापही आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही त्यातही महापालिका प्रशासनाकडून या गावांना मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नसून गावात परिस्थिती भीषण बनली आहे विकास कामे झाली नसल्याने ग्रामस्थांनी सांगितले आहे त्या गावांमध्ये रस्ते सांडपानी व पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे

वसार गावांमध्ये 1754 पुरुष व 1672 महिला मतदार आहेत, या गावातील ग्रामस्थांनी मिळून तर बहिष्कार घेण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी ठरली आहे या निर्णयानंतर अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ आपल्या बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम असून पुढील निर्णय गावातील तरुण घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले याबाबत ग्रामस्थ कोळेकर यांनी हे गाव कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश केल्यापासून कोणते काम गावात झाले नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले

सर, व्हिजवल व बाईट ftp केले आहे

ftp folder -- kalyan loksbha bahishkar 28.3.19

Conclusion:लोकसभा निवडणुकीत बहिष्कार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.