ETV Bharat / state

ठाणे कोरोना अपडेट : भिवंडीत 26 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

author img

By

Published : Jun 4, 2020, 9:16 PM IST

भिवंडी शहरात शहरात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ग्रामीणमध्ये 3 रुग्ण दगावले आहेत. शहरातील बाधित रुग्णांचा आकडा 216वर पोहोचला आहे. तर 93 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 112 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Bhiwandi corona update
भिवंडी कोरोना अपडेट

ठाणे - भिवंडीत आज (गुरुवारी) नवीन 26 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यात शहरी भागात 19 तर ग्रामीण भागातील 7 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 345वर पोहचली आहे.

भिवंडी शहरात शहरात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ग्रामीणमध्ये 3 रुग्ण दगावले आहेत. शहरातील बाधित रुग्णांचा आकडा 216 वर पोहोचला आहे. तर 93 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 112 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ग्रामीण भागात गुरुवारी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 4, कोनगाव परिसरात 2 तर वेढे (वज्रेश्वरी ) येथे 1 असे 7 नवे रुग्ण आढळले आहेत. या 7 नव्या रुग्णांमुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 131 वर पोहचला आहे. त्यापैकी 62 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 70 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

यामुळे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांची संख्या आता 245वर पोहचली आहे. तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 174 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.