ETV Bharat / state

ना राजकीय ज्ञान, ना आर्थिक पाठबळ, ना मनुष्यबळ' तरीही अपक्षाला २० हजारांवर मते - मनुष्यबळ

भिवंडी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये एका अपक्ष उमेदवाराकडे 'ना राजकीय ज्ञान आहे, ना आर्थिक पाठबळ आणि ना मनुष्यबळ. तरीही एक, दोन नव्हे तर चक्क २० हजारावर मतदान त्यांच्या पारड्यात पडले. आता त्यांना पडलेल्या मतांची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. नितेश जाधव, असे अपक्ष उमेदवाराचे नाव असून तो अवघ्या २६ वर्षाचा आहे.

अपक्षाला २० हजारावर मतदान
author img

By

Published : May 25, 2019, 12:16 PM IST

ठाणे - भिवंडी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये एका अपक्ष उमेदवाराकडे 'ना राजकीय ज्ञान आहे, ना आर्थिक पाठबळ आणि ना मनुष्यबळ. तरीही एक, दोन नव्हे तर चक्क २० हजारावर मतदान त्यांच्या पारड्यात पडले. आता त्यांना पडलेल्या मतांची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. नितेश जाधव, असे अपक्ष उमेदवाराचे नाव असून तो अवघ्या २६ वर्षाचा आहे.

भिवंडी मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतदान झाल्यानंतर अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. यामध्ये केवळ भाजपचे कपील पाटील, काँग्रेसचे सुरेश टावरे, बहुजन वंचित आघाडीचे डॉ. अरूण सावंत यांच्यातच लढत होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, कल्याण तालुक्यातील फळेगावातील तरूण अपक्ष उमेदवार नितेश जाधव यांच्याकडे बड्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कानाडोळा केला होता. मात्र, मतमोजणीला सुरूवात झाली आणि अखेरचा निकाल हाती आल्यावर जाधव यांच्या मतांचा आकडा बघून सगळ्यांनाच धक्का बसला.

या निवडणुकीत नितेश जाधव यांना २० हजार ६९७ मते मिळाली. विशेष म्हणजे जाधव यांना दोन ते चार हजार मते पडतील अशी चर्चा सत्तेत असणारे व विरोधी पक्ष नेत्यांच्या वर्तुळात रंगत होत्या. मात्र, जाधव यांनी त्यांचा तर्क फेल ठरवत तब्बल २० हजार ६९७ मते मिळवत आपली ताकद दाखवून दिली. मतमोजणीच्या दिवशी भाजपचे कपील पाटील यांना ५ लाख २३ हजार ५८३ मतदान झाले. काँग्रेसचे सुरेश टावरे यांना ३ लाख ६७ हजार २५४ तर वंचित बहुजन अघाडीचे अरूण सावंत यांना ५१ हजार ४४५ मते मिळाली. या तिघापाठोपाठ अपक्ष नितेश जाधव यांना २० हजार ६९७ इतकी मते पडली तर नोटाला १६ हजार ३३७ मतदान झाले.

विशेष म्हणजे भिवंडी लोकसभेतून १५ उमेदवार आपले नशीब अजमावत होते. त्यामध्ये सपा, बसपा, युतीच्या उमेदवारासह चार नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार होते. या चारही उमेदवारांना १ ते ३ हजार मतांवर समाधान मानावे लागले. त्यांच्या मानाने अपक्ष उमेदवार नितेश जाधव यांना विधानसभा निहाय पडलेल्या मतांची आकडेवारी नजर टाकली असता शहापूरमधून ७ हजार ४७४, भिवंडी ग्रामीण ४६७, भिवंडी पश्चिम ८८, भिवंडी पूर्व १४१, कल्याण पश्चिम ३९७ तर मुरबाड विधानसभा क्षेत्रातून ७ हजार ९०८ इतकी मते मिळाली आहेत. यापैकी मुरबाड विधानसभा क्षेत्रात नितेश जाधव यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत.

अवघ्या दोन महिन्यात मी निवडणूक लढविण्याचे ठरविले. ना राजकीय क्षेत्राच ज्ञान, ना आर्थिक पाठबळ किंवा ना मनुष्यबळ आहे. परंतु, ज्या तरूण मावळ्यांनी हा गड लविण्यासाठी मला ताकद दिली. तसेच खेडे, पाडे व वाड्यांतील मतदारांनी प्रचारादरम्यान मला दिलेले आश्वासन यामुळेच मी शेवटपर्यंत लढलो. सर्व मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला इतकी मते दिली. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मते मला मिळाली आहेत. लोकांनी व मतदारांनी सहकार्य केले तर येणारी निवडणूक देखील लढविणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, अपेक्षेपेक्षा जास्त मते नितेशच्या पारड्यात पडल्याने नितेश चर्चेचा विषय बनला आहे. शहापूर व मुरबाड या दोन विधानसभा मतदार संघातून उमेदवारी लढविल्याचा मानस नितेशने व्यक्त केल्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारांना डोकेदुखी ठरणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ना राजकीय ज्ञान ना आर्थीक पाठबळ ना मनुष्यबळ ; तरीही अपक्षाला 20 हजारावर मतदान  

ठाणे :-भिवंडी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये एका अपक्ष उमेदवाराकडे “ ना राजकीय ज्ञान ना आर्थीक पाठबळ ना मनुष्यबळ, तरीही एक, दोन नव्हे तर चक्क 20 हजारावर मतदान त्यांच्या पारड्यात पडले. आता त्यांना पडलेल्या मतांची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. नितेश जाधव असे अपक्ष उमेदवाराचे नाव असून तो अवध्या 26 वर्षाचा आहे.

भिवंडी मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतदान झाल्यानंतर अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. यामध्ये केवळ भाजपाचे कपील पाटील, कॉग्रेसचे सुरेश टावरे, बहुजन वंचित आघाडीचे डॉ. अरूण सावंत यांच्यातच लढत होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतू कल्याण तालुक्यातील फळेगावातील तरूण अपक्ष उमेदवार नितेश जाधव यांच्याकडे बड्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कानाडोळा केला होता. मात्र मतमोजणीला सुरूवात झाली आणि अखेरचा निकाल हाती आल्यावर जाधव यांच्या मतांचा आकडा बघून सगळ्यांनाच धक्का बसला. या निवडणुकीत नितेश जाधव यांना 20 हजार 697 मते मिळाली. विशेष म्हणजे जाधव यांना दोन ते चार हजार मते पडतील अशी चर्चा सत्तेत असणारे व विरोधी पक्ष नेत्यांच्या वर्तुळात रंगत होत्या. मात्र जाधव यांनी त्यांचा तर्क फेल ठरवत तब्बल 20 हजार 697 मते मिळवत आपले ताकद दाखवून दिली आहे. मतमोजणीच्या दिवशी भाजपाचे कपील पाटील यांना 5, 23, 583 मतदान झाले. कॉग्रेसचे सुरेश टावरे त्यांना 3, 67, 254 तर  वंचित बहुजन अघाडीचे अरूण सावंत यांना 51, 445  या तिघा पाठोपाठ  अपक्ष नितेश जाधव यांना 20, 697 इतकी मते पडली तर नोटा 16, 337.मतदान झाले.  

विशेष म्हणजे भिवंडी लोकसभेतून15 उमेदवार आपले नशीब अजमावत होते. त्यामध्ये सपा,बसपा युतीच्या उमेदवारासह चार नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार होते. या चारही उमेदवारांना 1 ते 3 हजार मतांवर समाधान मानावे लागले. त्यांच्या मानाने अपक्ष उमेदवार नितेश जाधव यांना विधानसभा निहाय पडलेल्या मतांची आकडेवारी नजर टाकली असता, शहापूरमधून 7 हजार 474,  भिवंडी ग्रामीण 467, भिवंडी पश्चिम  88, भिवंडी पूर्व 141, कल्याण पश्चिम 397 तर मुरबाड विधानसभा क्षेत्रातून 7 हजार 908 इतकी मते मिळाली आहेत. यापैकी मुरबाड विधानसभा क्षेत्रात नितेश जाधव यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. अवघ्या दोन महिन्यात अर्ज दाखल करून लोकसभा निवडणूक लढवली त्यामध्येही ना कुठल्या सभा ना कुठल्या इतर गोष्टी तरीही अपेक्षे पेक्षा जास्त मते आपल्या पारड्या पाडली. यामुळे नतेश चर्चेचा विषय बनला आहे. शहापूर व मुरबाड या दोन विधानसभा मतदार संघातून उमेदवारी लढविल्याचा मानस नितेश यांनी व्यक्त केल्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारांना डोकेदुखी ठरणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

अपक्ष उमेदवार नितेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, अवघ्या दोन महिन्यात मी निवडणूक लढविण्याचे ठरविले. ना राजकीय क्षेत्राच ज्ञान ना आर्थीक पाठबळ ना मनुष्यबळ. परंतू ज्या तरूण मावळ्यांनी हा गड लविण्यासाठी मला ताकद दिली. तसेच खेडे, पाडे व वाड्यांतील मतदारांनी प्रचारा दरम्यान मला दिलेले आश्वासन यामुळेच मी शेवट पर्यंत लढलो. सर्व मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला इतकी मते दिली. माझ्या अपेक्षे पेक्षा जास्त मते मला मिळाली आहेत. लोकांनी व मतदारांनी सहकार्य केले तर येणारी निवडणूक देखील लढविणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
   
I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.