ETV Bharat / state

Thane Accident: ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने, दोघांचा जागीच मृत्यू

टेम्पो - दुचाकीच्या अपघातात चाकाखाली चिरडून दुचाकीस्वार पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना भिवंडी शहरातील अंजुर फाटा परिसरातील आहे. तर दुसऱ्या अपघाताच्या घटनेत दुचाकीवरून जाणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तोही जागीच ठार झाला. ही घटना कल्याण पश्चिम भागातील गोवींदवाडी बायपास मार्गावर घडली आहे.

Thane Accident
ट्रकचे चाक डोक्यावरून गेले
author img

By

Published : May 27, 2023, 10:59 PM IST

ठाणे : पहिल्या घटनेत भरधाव ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने झालेल्या अपघातात कल्याण डोंबिवलीतील एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुर्गाडी किल्ल्यावरून पत्रीपूल जाणाऱ्या गोवींदवाडी बायपास मार्गावरील फानूस ढाब्यासमोर घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रुपेश महादू गायकवाड (वय ,३४ रा. आधारवाडी, कल्याण) असे भीषण अपघातात जागीच ठार झालेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर या दोन्ही अपघात प्रकरणी दोन्ही चालकांना अटक करण्यात आली आहे.

डोंबिवली विभागात सफाई कर्मचारी: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रुपेश हा कल्याण पश्चिम भागातील आधारवाडी भागात असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरमध्ये कुटूंबासह राहत होता. तो महापालिकेच्या डोंबिवली विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्यातच आज सकाळी नेहमीप्रमाणे मृत रुपेश हा आपल्या दुचाकीवरून कामाच्या ठिकाणी डोंबिवलीकडे दुर्गाडी किल्ल्यावरून पत्रीपूल जाणाऱ्या गोवींदवाडी बायपास मार्गाने जात होता. त्याच सुमाराला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक खाली दुचाकीसह तो पडल्याने, त्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर घटनास्थळावरून ट्रक चालक पत्रीपूलच्या दिशेने ट्रकसह पळून गेला. या अपघाताची माहिती वाहतूक पोलिसांना मिळताच पोलिसांनी, ट्रक चालकाचा पाठलाग करत त्याला कल्याण पूर्वेतील सूचक नाका येथून ट्रकसह ताब्यात घेतले.

ट्रक चालकास केले अटक: घटनेची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. रुपेशचा मृत्यूदेह शवविच्छदेनासाठी पालिकेच्या बाई रूखमणी रुग्णालयात पाठवला आहे. ट्रक चालक शोभनाथ तिवारी (रा. मुंबई मुलूंड ) याच्यावर भादंवि कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी दिली आहे. विशेष म्हणजे गोवींदवाडी बायपास हा मृत्यूचा सापळा बनला आहे. आतापर्यत या मार्गावर १०० हुन अधिक लहान मोठे अपघात झाल्याची नोंद असून या अपघातात ५० च्या जवळपास नागरिकांचा अपघात बळी गेले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन अपघातास आळा घालायची गरज असल्याचे मत परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

टेम्पो आणि दुचाकीचा अपघात: दुसरी घटना भिवंडी शहरातील अंजुर फाटा परिसरातील स्पेक्ट्रम रुग्णालयासमोर आयशर टेम्पो आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. यात दुचाकीस्वार पतीचा टेम्पोच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त पत्नीच्या फिर्यादीवरून नारपोली पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

जागीच मृत्यू झाला: हरीश विनोद सुरवाडे (२४) असे अपघातात मयत झालेल्या पतीचे नाव आहे. तर कंचन सुरवाडे (२१) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. तसेच या अपघातास कारणीभूत ठरणारा टेम्पो चालक हसीब रईस हुसेन शेख (१९) यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दाम्पत्य काल्हेर पाईपलाईन येथील दत्तनगरी इमारत क्र.१२ च्या रूम नं.२०२ मध्ये राहत आहेत. हे दाम्पत्य २६ मे रोजी खरेदीसाठी शाईन दुचाकी क्र.एमएच १९ डीक्यू ६८५५ वरून काल्हेरहून अंजुर फाट्याकडे येत होते. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास स्पेक्ट्रम रुग्णालयाजवळ आले असता, त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पो क्र.डीडी ०१ एम ९५८१ वरील चालक हसीबने दुचाकीला उजव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. टेम्पोची दुचाकीला धडक बसल्याने अपघात झाला. त्यावेळी दुचाकीस्वार टेम्पोखाली येवून टेम्पोचे डाव्या बाजूकडील चाक हरीशच्या डोक्यावरून गेल्याने, त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पत्नी गंभीर जखमी: तर या अपघातात त्याची पत्नी कंचनच्या डोक्याला, खांद्याला व पायाला मुका मार लागून गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हरीशचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवला आहे. तर त्याची पत्नी कंचनच्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि व्ही.एस.शिरसाट करीत आहेत.

हेही वाचा -

Girl dies suffocation in car लपाछपी खेळणे उठले जिवावर गाडीत लॉक झाल्याने मुलीचा मृत्यू

Road Accident In Hingoli कळमनुरी नांदेड महामार्गावर भीषण अपघात उभ्या ट्रकला आयशर धडकून 4 जण ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.