ठाणे - उल्हास नदीत दोन तरुण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कल्पेश चौधरी (वय २०) आणि कार्तिक लाडी (वय १७) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.
हे दोघेही बदलापूर पूर्व भागातील रहिवासी असल्याचे समजले आहे. घटनास्थळी पोलिस आणि फायर ब्रिगेड दाखल झाले असून शोध आणि बचावकार्य सुरू आहे.