ठाणे - भिवंडीच्या काल्हेर परिसरातील एका गोडाऊनवर छापेमारी करीत तस्कऱ्या विकास प्रेमशंकर चौबे उर्फ छोटा पंडीत याला पोलीस पथकाने अटक केली आहे. ( Smuggler Who Raided Godown In Bhiwandi ) पोलीस पथकाने या छापेमारीत 350 किलो गांजा, मोबाईल, रोख रक्कम असा 35 लाख 3 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अमली पदार्थ तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल - अमली पदार्थ तस्करीबाबत कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे शाखा युनिट-५ चे पोलीस पथक करीत होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अंबालाल जगदिश जाट रा. दिपज्योती रेसिडेन्सी, काल्हेर, भिवंडी याच्यावर अमली पदार्थ तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल होता. त्याच्याकडून त्यावेळी पोलिसांनी ११० किलो गांजा हस्तगत केला होता.
एकूण ३५ लाख ३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त - या घटनेनंतर तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने अटक आरोपीच्या तस्करी टोळीतील आरोपी विकास प्रेमशंकर चौबे उर्फ छोटा पंडीत, रा. मंगल भवन बिल्डींग, कशेळी, भिवंडी याला अटक केली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार काल्हेर येथील गोडाऊनवर छापेमारी केल्यानंतर गोदामात ३५ गोण्यांमध्ये लपविलेला ३५० किलो गांजा, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ३५ लाख ३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखा पथक आता अमली पदार्थ तस्करांच्या टोळीतील सदस्यांचा शोध घेऊन टोळी उध्वस्त करण्याची कारवाई करीत आहेत.
हेही वाचा - दाक्षिणात्य अभिनेता विजयला न्यायालयाचा दणका.. इंपोर्टेड कारचा कर न भरल्याने दंड