ETV Bharat / state

टोरेंट पॉवर कंपनीच्या कारभाराचा निषेध; 100 हून अधिक गावांचा मतदानावर बहिष्कार - भिवंडी ग्रामीण मतदारसंघ

टोरेंट पॉवर कंपनीकडून वीज बिल तसेच अन्य खोट्या तक्रारी दाखल करून मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड लादण्यात येतो. याचा निषेध करण्यासाठी भिवंडी परिसरातील नागरिक एकवटले आहेत.

टोरेंट पॉवर कंपनीच्या कारभाराचा निषेध; 100 हून अधिक गावांचा मतदानावर बहिष्कार
author img

By

Published : Oct 20, 2019, 2:26 PM IST

ठाणे - भिवंडी शहरासह ग्रामीण भागात खासगीकरणातून वीज पुरवठा करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीच्या मनमानी काभाराचा निषेध करत जवळपास 100 हून अधिक स्थानिक गाव-पाड्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच गावकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीला याचा मोठा फटका बसणार आहे.

टोरेंट पॉवर कंपनीच्या कारभाराचा निषेध; 100 हून अधिक गावांचा मतदानावर बहिष्कार

भिवंडी ग्रामीण मधील दिवे, केवणी, पाये, पायगाव, खारबाव, नवघर, अंजुर, मानकोली, सुरई, या गावांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यासोबतच भरोडी, ओवली, ठाकऱ्याचा पाडा, डोंगराली, अलीमघर, वडूनवघर, वडघर या गाव-पाड्यांतील गावकऱ्यांनी जनजागृती करत प्रत्येक गावात जाऊन मतदानवर बहिष्कार टाकण्यासाठी पुढाकार घेतला.

टोरेंट पॉवर कंपनीकडून वीज बिल तसेच अन्य खोट्या तक्रारी दाखल करून मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड लादण्यात येतो. याचा निषेध करण्यासाठी भिवंडी परिसरातील नागरिक एकवटले आहेत.

आजपर्यंत संबंधित कंपनीच्या विरोधात भिवंडीतील विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी मागील 4 ते 5 वर्षांत अनेकदा आंदोलने, मोर्चे तसेच उपोषणे केल्याचे गावकऱयांनी सांगितले. मात्र, या कंपनीच्या विरोधात कोणतीही कारवाई न करता सरकारने त्यांना अधिक मुदतवाढ दिली आहे. याच्या निषेधार्थ स्थानिकांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता एकत्र येत या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले.

भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे दुसऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, मनसेकडून शुभांगी गोवारी आणि राष्ट्रवादीने माधुरी म्हात्रे यांना उमोदवारी जाहीर केली आहे. भिवंडी ग्रामीण मधील 100 हून अधिक गावांनी पुकारलेला असहकार या निवडणुकीवर मोठा परिणाम करणार आहे.

Intro:kit 319Body: टोरेंट पॉवर कंपनीच्या विरोधात 100 हून अधिक गाव-पाड्यांनी टाकला निवडणुकीवर बहिष्कार

ठाणे :- भिवंडी शहरासह ग्रामणी भागात खाजगीकरणातून वीज पुरवठा करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीच्या विरोधात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवधे काही तास शिल्लक राहिले असतानाच, भिवंडी तालुक्यातील जवळपास 100 हून अधिक गाव-पाड्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेषतः भिवंडी ग्रामीण मधील दिवे, केवणी, पाये, पायगाव, खारबाव, नवघर, अंजुर, मानकोली, सुरई, भरोडी, ओवली, ठाकऱ्याचा पाडा, डोंगराली, अलीमघर, वडूनवघर, वडघर यांसह आदी गावपाड्यांवरील गावकऱ्यांनी जनजागृती करीत प्रत्येक गावात जाऊन निवडणुकीचा बहिष्कार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात वीज पुरवठा करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीच्या अव्वाच्या सव्वा विज बिल व खोट्या केसेस दाखल करून मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड दिला जातो. त्याचा निषेध करण्यासाठी भिवंडीतील ग्रामीण परिसरातील गांवकरी एकटावले आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या विरोधात भिवंडी ग्रामीण तसेच शहरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी गेल्या ४ ते ५ वर्षात अनेकदा आंदोलने, मोर्चे, उपोषणे, केली. मात्र या कंपनीच्या विरोधात कोणतीही कारवाई न करता सरकारने अधिक मुदतवाढ दिली आहे. याच्या निषेधार्थ भिवंडी ग्रामीण मधील महिला व पुरुषांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता स्वतंत्र एकत्र येत या विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे.
दरम्यान, भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे दुसऱ्यांना आपले नशीब आजमावत आहेत. तर मनसे मधून शुभांगी गोवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून माधुरी म्हात्रे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भिवंडी ग्रामीण मधील 100 हून अधिक गावाने दाखवलेला बहिष्कार या निवडणुकीवर मोठा परिणाम होऊन सेना - भाजपच्या उमेदारांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Conclusion:bhiwnadi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.