ETV Bharat / state

कारागृहाऐवजी रमेश कदम ठाण्यातील घरात, 1 पोलीस बडतर्फ तर 4 निलंबित - Annabhau sathe mahamanadal scam

ठाण्यात १८ ऑक्टोबरला निवडणूक अधिकारी आणि पोलिसांच्या धडक कारवाईत 53 लाख 56 हजार रुपये राजू खरे नावाच्या व्यक्तीकडून जप्त केले गेले होते. या प्रकरणी एक मोठा खुलासा झाला असून या प्रकरणात 5 पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.

रमेश कदम
author img

By

Published : Oct 20, 2019, 2:10 PM IST

ठाणे - आमदार रमेश कदम यांना रूग्णालयाऐवजी खासगी गाडीने ठाण्याला घेऊन जाणे ५ पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी एका पोलिसाला बडतर्फ करण्यात आले आहे. तर 4 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी तुरूगांत असलल्या आमदार रमेश कदमांना मुंबईतील जे जे हॉस्पिटलमधून खासगी गाडीने या ५ पोलिसांनी ठाण्याला नेले होते.

हेही वाचा - उच्च न्यायालयाकडून रमेश कदमांना उमेदवारी अर्ज भरण्यास तात्पुरता जामीन

ठाण्यात १८ ऑक्टोबरला निवडणूक अधिकारी आणि पोलिसांच्या धडक कारवाईत 53 लाख 56 हजार रुपये राजू खरे नावाच्या व्यक्तीकडून जप्त केले गेले होते. याप्रकरणी एक मोठा खुलासा झाला असून या प्रकरणात 5 पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळ्या प्रकरणी जेल मध्ये असलेले आमदार रमेश कदम यांना मुंबईतील जे जे हॉस्पिटलमधून खासगी गाडीने ठाण्याला नेले होते. या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर दिलीप चव्हाण, दत्तू खेताडे, उत्तम कांबळे आणि विकास गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा - महामंडळ घोटाळा प्रकरणातील आरोपी रमेश कदम निवडणूक लढविणार? जामिनासाठी न्यायालयात याचिका

ठाण्यात पकडेलेली ही रोकड सोलापूर जिल्ह्यातील एका राजकीय नेत्याला निवडणुकीत देण्यासाठी जमा केली होती, अशी माहिती समोर आली आहे. राजू खरे नावाची व्यक्ती रक्कम घेऊन जाताना ठाण्यातील घोडबंदर येथील पुष्पांजली इमारतीच्या आवारात पोलीस आणि निवडणूक भरारी पथकाने त्यांना पकडले होते. त्यानतंर पुढील चौकशीकरता आयकर विभाग, ठाणे पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांनी राजू खरेच्या याच पुष्पांजली इमारतीतील फ्लॅट नंबर 301 वर देखील छापा टाकला होता. बराच वेळ कारवाईनंतर पोलिसांनी याप्रकरणी 5-6 जणांना चौकशीकरता ताब्यात घेऊन जप्त केलेली रक्कम विभागकडे सुपुर्द केली होती.

Intro:आमदार रमेश कदम यांना हाॅस्पिटल ऐवजी ठाण्याला घेऊन जाणं ५ पोलिसांना पडले महाग १ पोलिस बडतर्फ तर ४ पोलीस निलंबित
निवडणूकीकरता ठाण्यातून सोलापूरला जाणार होती ५३ लाख ४६ हजार रुपये एवढी मोठी रक्कमBody:
ठाण्यात १८ ॲाक्टोबरला निवडणूक अधिकारी आणि पोलिसांच्या धडक कारवाईत ५३ लाख ५६ हजार रुपये राजू खरे नावाच्या व्यक्तीकडून जप्त केले गेले होते या प्रकरणी एक मोठा खुलासा झाला असून या प्रकरणात ५ पोलिसांवर कारवाई करण्यात आलीये अण्णा भाऊ साठे महामंडळात घोटाळ्या प्रकरणी जेल मध्ये असलेले आमदार रमेश कदम यांना मुंबईतील
जे जे हाॅस्पिटल मधून खाजगी गाडीने ठाण्याला या ५ पोलिसांनी नेले होते... या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात आली आणि त्यात निष्पन्न झाल्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलय तर दिलीप चव्हाण, दत्तू खेताडे, उत्तम कांबळे आणि विकास गायकवाड यांना निलंबित करण्यात आलय...

ठाण्यात १८ ॲाक्टोबरला पकडेलेली रोकडी ही सोलापूर जिल्ह्यातील एका राजकीय नेत्याला निवडणूकीत देण्यासाठी जमा केली होती अशी माहिती समोर आली होती ती राजकीय व्यक्ती आमदार रमेश कदम असून पक्षाने उमेदवारी पोलीस न दिल्याने जमा केलेले पैसे दुस-या कामा करिता राजू खरे नावाच्या व्यक्तीला घेऊन जाताना ठाण्यातील घोडबंदर येथील पुष्पांजली इमारतीच्या आवारात पोलीस आणि निवडणूक भरारी पथकाने पकडले होते. त्यानतंर पुढील चौकशीकरता आयकर विभाग, ठाणे पोलिस आणि निवडणूक अधिकारी यांनी राजू खरेच्या याच पुष्पांजली इमारतीतील फ्लॅट नंबर ३०१ वर देखील छापा टाकला होता... बराच वेळ कारवाईनंतर पोलिसांनी या प्रकरणी ५-६ जणांना पोलिसांनी चौकशीकरता ताब्यात घेऊन जप्त केलेली रक्कम ५३ लाख ४६ हजार रुपये आयकर विभागकडे सुपुर्द करण्यात आली होती
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.